शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

उजनी पाणलोट क्षेत्रातील वीजपुरवठा आठ तास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2016 01:38 IST

उजनी पाणलोटक्षेत्रातील शेतीपंपांचा वीजपुरवठा पाच तासांवरून आठ तासांवर आणण्यास शनिवारी (दि. ६) पालकमंत्री गिरीश बापट यांनी मान्यता दिली

इंदापूर : उजनी पाणलोटक्षेत्रातील शेतीपंपांचा वीजपुरवठा पाच तासांवरून आठ तासांवर आणण्यास शनिवारी (दि. ६) पालकमंत्री गिरीश बापट यांनी मान्यता दिली. याबाबत आदेश जिल्हाधिकारी सौरभ राव यांना दिला आहे. त्याअनुषंगाने राव यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. शनिवारी पालकमंत्री गिरीश बापट, जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्यासमवेत कालवा सल्लागार समितीची बैठक होती. त्या बैठकीपूर्वी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उजनी पाणलोट क्षेत्रातील शेतीपंपांचा वीजपुरवठा पाच तासांवरून आठ तासांवर आणण्याची मागणी केली होती. बैठकीच्या वेळी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी जोरदारपणे हीच भूमिका मांडली. निवेदनही सादर केले. निवेदनाची दखल घेऊन पालकमंत्री बापट यांनी पुढील कार्यवाही केली.हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अजित पवार व भरणे यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू होता. उजनी धरणातील पाणीसाठा बेरजेमध्ये आल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, तुकाराम बंडगर, साहेबराव चोपडे आदी उपस्थित होते. सोलापूर शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागात झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उजनी धरणातील पाण्याचा साठा आरक्षित केला होता.त्यामुळे उजनी धरणाच्या पाणलोटक्षेत्रातील इंदापूर, करमाळा, माढा, कर्जत, श्रीगोंदा, दौंड तालुक्यातील उपसा जलसिंचन योजनेच्या शेतीपंपांचा विद्युत पुरवठा गेले सहा महिने आठ तासांऐवजी पाच तास केला होता. त्यामुळे उजनीच्या शेतकऱ्यांचे शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले होते.