शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

ऐरोलीतील आठ हॉटेल सील

By admin | Updated: July 2, 2016 03:01 IST

परवानगी न घेता व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व मिठाई दुकानांविरोधात पालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे.

नवी मुंबई : परवानगी न घेता व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व मिठाई दुकानांविरोधात पालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे. शुक्रवारी ऐरोलीतील आठ दुकाने सील केली असून कारवाई केलेल्या हॉटेल व मिठाई दुकानांची संख्या ६८ झाली आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये हॉटेल, मिठाई, बेकरी, केटरर्स चालकांनी महापालिकेचा परवाना घेणे आवश्यक आहे. परंतु अनेक व्यावसायिकांनी पालिकेचे परवाने न घेताच व्यवसाय सुरू केला आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली परवाना विभागाचे अधिकारी दत्तात्रय नांगरे व त्यांच्या पथकाने सर्व दुकानदारांनी परवाना घेण्याचे आवाहन केले आहे. यानंतरही ज्यांनी परवाने घेतले नाहीत त्यांची दुकाने सील करण्यास सुरवात केली आहे. सीबीडी, सीवूड,नेरूळ, वाशी , कोपरखैरणे परिसरातील ६० हॉटेल, मिठाई दुकानांवर कारवाई केली आहे. शुक्रवारी ऐरोली परिसरात मोहीम राबविण्यात आली. येथील लिटील चायना, मधुर स्वीट, महालक्ष्मी स्वीट्स, हॉटेल साहील, श्रीकृष्ण बंगाली स्वीट्स, श्रीसाईराम मेस, फूड कार्निवल, नाजनुर केटरर्स ही आठ दुकाने सील केली आहेत. पालिकेच्या धडक मोहिमेमुळे विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून परवाने मिळविण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)>सीबीडी, सीवूड,नेरूळ, वाशी , कोपरखैरणे परिसरातील ६० हॉटेल, मिठाई दुकानांवर कारवाई केली आहे. शुक्रवारी ऐरोलीतील लिटील चायना, मधुर स्वीट, महालक्ष्मी स्वीट्स, हॉटेल साहील, श्रीकृष्ण बंगाली स्वीट्स, श्रीसाईराम मेस, फूड कार्निवल, नाजनुर केटरर्स ही आठ दुकाने सील केली आहेत.