शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील आठ क्रशर मशीन सील

By admin | Updated: October 19, 2016 01:42 IST

अवैध गौणखनिज वाहनाऱ्या २७ वाहनांवर अप्पर तहसीलदार प्रशांत बेडसे पिंपरी- चिंचवड हवेली यांनी धडक कारवाई केली आहे़

पिंपरी : शहरातील अवैधरीत्या गौणखनिज उत्खननावर बंदी असताना, अनधिकृतरीत्या उत्खनन केल्यामुळे ८ क्रशर मशीन सील करून, अवैध गौणखनिज वाहनाऱ्या २७ वाहनांवर अप्पर तहसीलदार प्रशांत बेडसे पिंपरी- चिंचवड हवेली यांनी धडक कारवाई केली आहे़ त्यांच्याकडून सुमारे २३ लाख २७ हजारांचा दंड वसूल केला आहे़ चार दिवसांत तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली ही सर्वांत मोठी कारवाई झाली आहे़ उर्वरीत गौणखनिज उद्योजकांचा साडेआठ लाखांचा दंड लवकरच वसूल केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली़ मुरूम, माती, वाळू, दगड, डबर, खडी हे गौणखनिजात येते़ रॉयल्टी न भरता गौणखनिजांचे बेकायदेशीर उत्खनन केल्यामुळे कारवाई केल्याची माहिती बेडसे यांनी दिली़ १ सप्टेंबरला क्रशर मालकांच्या बैठकीत कर न भरल्यास कारवाई करण्याची नोटीस दिली होती़ तरीही संबंधितांनी गौणखनिजांचे अनधिकृत उत्खनन सुरू ठेवले़ त्यामुळे तहसील कार्यालयामार्फत दोन महिन्यांपूर्वी अवैध गौणखनिज उत्खनन करणाऱ्यांना पहिली नोटीस देण्यात आली होती़ मालमत्ता अटकाव करण्यासाठी दुसरी नोटीस देऊन दंड वसुली सुरू केली आहे.(प्रतिनिधी)>अनधिकृत उत्खनन : धडक कारवाईची मोहीम शासनाच्या नियमांप्रमाणे उत्खनन करण्यापूर्वी डबर, मुरुम, वाळू, माती यांची रॉयल्टी भरणे बंधनकारक आहे़ परंतु अनेकांकडून या नियमाची पायमल्ली केली जाते. त्यामुळे धडक मोहीम सुरू केली असून, एकूण २७ वाहनांवर कारवाई करण्यात आली़ त्यामध्ये वाळूची वाहतूक करणाऱ्या ८ ट्रक आहेत़ तर १९ ट्रकमध्ये अवैधरीत्या मुरूम, डबर, खडीची वाहतूक करताना पकडण्यात आल्या आहेत़ कारवाईची गौणखनिज तसेच वाळूची वाहतूक करणाऱ्यांनी धास्ती घेतली आहे़ या कारवाईत तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार संजय भोसले, मंडलाधिकारी सूर्यकांत पाटील, कामगार तलाठी, कोतवाल यांनी सहभाग घेतला़ अवैधरीत्या गौणखनिज उत्खनन आणि वाहतूक बंद करण्यासाठी, तसेच वाळूची चोरटी वाहतूक बंद करण्यासाठी धडक मोहिमेचा वेग वाढविण्यात येणार आहे़ वारंवार नोटिसा देऊनही अवैध गौणखनिज थांबले नाही, तर गरज पडल्यास फ ौजदारी कारवाई करणार आहे़- प्रशांत बेडसे, अप्पर तहसीलदार, पिंपरी- चिंचवड