शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात आढळला इजिप्शियन गिधाड

By admin | Updated: January 14, 2015 00:08 IST

तारांमध्ये अडकून जखमी ; दोन घरटी आढळली.

अकोला : गिधाडांच्या प्रजातीतील दुर्मीळ इजिप्शियन किंवा युरेशियन व्हल्चर (गिधाड) जिल्ह्यातील सांगळूद येथे मंगळवारी आढळला. विद्युत तारांमध्ये अडकल्याने या पक्ष्याच्या पायाला इजा झाली आहे. गावकर्‍यांनी त्याला स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून वनविभागाच्या स्वाधीन केले. सांगळूद येथे तारांमध्ये एक पक्षी अडकल्याचे गावकर्‍यांच्या लक्षात आले. पायाला इजा झाल्यामुळे तो जमिनीवर पडला. त्यानंतर गावातीलच काहींनी या पक्ष्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अकोला येथील सातपुडा फाउंडेशनचे अमोल सावंत व सर्पमित्र शेख मो. ऊर्फ मुन्ना यांच्याशीही संपर्क केला. त्यांनी पक्ष्यावर उपचार करून, त्याला वनविभागाच्या हवाली केले. याबद्दल माहिती देताना पक्षिमित्र अमोल सावंत यांनी सांगितले, की हा पक्षी गिधाड प्रजातीतील इजिप्शियन व्हल्चर आहे. हा पक्षी प्रामुख्याने आंध्रप्रदेश, तामिळनाडू व महाराष्ट्रात आढळतो. माळरानावर या पक्ष्याचा आढळ आहे. हा पक्षी जिल्ह्यात स्थलांतर करून आला असावा. दोन वर्षांपूर्वी या प्रजातीच्या पक्ष्याचे एक जोडपे निदर्शनास आले होते. त्यांचे हे पिल्लू असू शकते. या पक्ष्याचे घरटे असल्याचे काही नागरिकांनी सांगितले. त्या घरट्यांचा सध्या शोध घेण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यात या पक्ष्याचे वास्तव्य असणे ही आश्‍चर्यकारक बाब मानली जात आहे. *वनविभागाला आढळली दोन घरटीइजिप्शियन व्हल्चर हा पक्षी जखमी अवस्थेत आढळल्यानंतर वनविभागाने सांगळूद परिसरात जाऊन पाहणी केली. त्यांना या पक्ष्याची दोन घरटी व विष्ठा आढळली. त्यामुळे या ठिकाणी या पक्ष्यांचा वावर असल्याचे सिद्ध झाले. दोन घरटी असल्यामुळे दोन मादी नक्कीच असतील. ही मादी दोन अंडी देते. त्यामुळे दोन घरट्यांमधून चार पक्षी किंवा सात ते आठ पक्ष्यांचे वास्तव्य असू शकते, असा अंदाज वनविभागाचे अधिकारी दुबे यांनी वर्तविला आहे.