शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहारातून सहकार हद्दपारीचे प्रयत्न

By admin | Updated: October 31, 2016 04:57 IST

महाराष्ट्र सहकारी ग्राहक महासंघाने शालेय पोषण आहार पुरवठ्याची नऊ जिल्ह्यांतील कामे सहकारी ग्राहक संस्थांना न देता खासगी कंत्राटदारांच्या घशात घातली

सदानंद सिरसाट,

अकोला- सहकाराची चळवळ मजबूत करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या महाराष्ट्र सहकारी ग्राहक महासंघाने शालेय पोषण आहार पुरवठ्याची नऊ जिल्ह्यांतील कामे सहकारी ग्राहक संस्थांना न देता खासगी कंत्राटदारांच्या घशात घातली. मात्र, राज्याच्या पणन संचालकांनी कंत्राटदारांचे काम तत्काळ बंद करण्याचा आदेश दिला. या आदेशालाही सहकारमंत्र्यांकडे आव्हान दिल्याचे समोर आले आहे.शिक्षण विभागाच्या पोषण आहार योजना पुरवठ्याचे नऊ जिल्ह्यांतील काम राज्य सहकारी ग्राहक संस्था महासंघाला मिळाले. ते काम करण्यासाठीचा करारनामा शालेय शिक्षण संचालक आणि ग्राहक महासंघामध्ये झाला. त्यामुळे शिक्षण विभागाकडे काम करणारी संस्था ग्राहक महासंघच आहे. मात्र, ग्राहक महासंघाच्या उपविधीमध्ये तरतूद नसतानाही पुरवठ्यासाठी खासगी कंत्राटदार नेमले. या प्रकाराने महासंघाचे नोंदणीकृत सभासद असलेल्या ग्राहक संस्थांना हक्कापासून वंचित ठेवले. ग्राहक महासंघाने केलेला हा प्रकार सहकार कायद्यातील तरतुदीनुसार केलेल्या तपासणीत १५ जून २०१६ रोजीच्या अहवालात उघड झाला. त्याची गंभीर दखल घेत, राज्याचे पणन संचालक डॉ. किशोर तोष्णीवाल यांनी १६ जून २०१६ रोजी राज्य सहकारी ग्राहक संस्था महासंघाला नोटीस बजावली. त्यामध्ये कंत्राटदारांची कामे बंद करून ग्राहक सहकारी संस्थांना काम देण्याचे निर्देश दिले. मात्र, ग्राहक महासंघाने या आदेशालाच सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे आव्हान दिले. >पणन संचालकांच्या १६ जून रोजीच्या आदेशावर सहकारमंत्र्यांकडे याचिका दाखल आहे. त्यावर सुनावणीही झाली. येत्या दोन दिवसांत निर्णय होण्याची शक्यता आहे.- एन.एस. खटके, अतिरिक्त कार्यकारी संचालक,ग्राहक संस्था महासंघ, मुंबई