शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुलींच्या शासकीय वसतिगृहासाठी प्रयत्नशील

By admin | Updated: June 9, 2017 02:55 IST

महाड येथे मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह बांधण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी गुरुवारी महाड येथे दिली.

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : महाड येथे मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह बांधण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी गुरुवारी महाड येथे दिली. सामाजिक न्याय विभागाकडून महाड येथे १०० मागासवर्गीय मुलांकरिता भव्य वसतिगृह बांधण्यात आले आहे. या इमारतीमध्ये एकूण ३४ खोल्या असून स्वयंपाकगृह, डायनिंग हॉल, वाचनालय, व्यायामशाळा यांचा समावेश आहे. या इमारतीकरिता ५ कोटी ६९ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. मागासवर्गीय मुलांच्या या वसतिगृहाच्या उद्घाटनप्रसंगी बडोले बोलत होते. सामाजिक न्यायमंत्री बडोले म्हणाले, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकासाकरिता समाजकल्याण विभाग विशेष प्रयत्न करत असून याकरिता बार्टी या संस्थेकडून विविध उपक्र मांचे आयोजन करण्यात येते. याचा लाभ या वसतिगृहातील मुलांनी घेऊन आपली क्षमता सिद्ध करावी. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे सामाजिक समतेचा लढा दिला. अशा या क्रांतिभूमीतील चवदारतळ्याच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्याची यंत्रणा बसविण्याबाबत कार्यवाही करणार असे म्हणाले.राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी शासकीय वसतिगृहातील मुलींच्या सुरक्षेबाबतही समाजकल्याण विभागाकडून विशेष लक्ष दिले जाते असे सांगितले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत डॉ.आंबेडकर समाजभूषण पुरस्काराचे आयोजन करण्यात येईल असे सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे, आ. भरत गोगावले आदी उपस्थित होते.जावळी येथील निवासी शाळेचे उद्घाटनमाणगाव तालुक्यातील जावळी येथील अनुसूचित जातीच्या मुलांच्या शासकीय निवासी शाळेचे उद्घाटन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी समाजकल्याण विभागाचे उपायुक्त यशवंत मोरे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. आभार प्रदर्शन समाज कल्याण सहायक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी केले.