शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कार्यक्षम अधिकाऱ्यास बदलीची बक्षिसी!

By admin | Updated: April 29, 2017 03:35 IST

अन्न व औषध प्रशासनातील गैरव्यवहार उघडकीस आणणारे दक्षता विभागाचे सहआयुक्त हरीश बैजल यांची बदली करून एफडीएमधील अधिकाऱ्यांच्या टोळीला अभय देण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अतुल कुलकर्णी / मुंबईअन्न व औषध प्रशासनातील गैरव्यवहार उघडकीस आणणारे दक्षता विभागाचे सहआयुक्त हरीश बैजल यांची बदली करून एफडीएमधील अधिकाऱ्यांच्या टोळीला अभय देण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.एप्रिल २०१६ मध्ये सोलापुरातील एव्हॉन कंपनीच्या तपासणीत सापडलेल्या दोन हजार कोटींच्या इफेड्रीन प्रकरणी दक्षता विभागाचे सहआयुक्त बैजल यांनी ‘एफडीए’तील ७ अधिकाऱ्यांवर ठपका ठेवून त्यांच्यावर कारवाईची शिफारस केली होती. मात्र, त्यांच्या अहवालानुसार कारवाई करण्याऐवजी अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांच्या कार्यालयाने सहआयुक्तांना अशी कृती करता येते की नाही, अशी विचारणा विधि व न्याय विभागाकडे केली. शिवाय, विधि विभागाला अर्धवट माहिती दिली गेली. पुढे अ‍ॅडव्होकेट जनरल यांचे मत मागवले गेले. त्यावर सहआयुक्तांची कृती योग्य नसली तरी अधिकारी दोषी नाहीत असे म्हणता येणार नाही, असा अभिप्राय विधि व न्याय विभाग आणि एजींनी दिला. मात्र त्यावरही विभागाने पुढे काहीच कारवाई केली नाही. कोडीन फॉस्फेट प्रकरणातही ५ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यास शासनाने आॅक्टोबर २०१६ मध्ये मंजुरी दिली, पण त्या प्रकरणातही आयुक्त हर्षदीप कांबळे आणि मंत्री कार्यालयाने त्याची अंमलबजावणी केली नाही. सप्टेंबर २०१६ मध्ये बैजल यांनी आस्थापना शाखेची तपासणी केली व अहवाल आयुक्तांना दिला. त्यावरही कारवाई करण्याऐवजी आयुक्तांनी ज्या आदेशांच्या आधारे बैजल यांनी ही तपासणी केली तो आदेशच रद्द करून टाकला आणि तपास अधिकाऱ्यालाही बदलले.बैजल यांनी केलेल्या तपासणीत ३७ प्रकरणांमध्ये गंभीर गैरप्रकार आढळून आले असताना आयुक्तांनी कोणतीही कारवाई केली नाही, याबाबत ‘सोसायटी फॉर द अवेअरनेस आॅफ सिव्हिल राइट्स’चे यजुर्वेदी राव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह तत्कालीन मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, अतिरिक्त मुख्य सचिव मेधा गाडगीळ, के.पी. बक्षी यांच्याकडे लेखी तक्रार केली. पण त्याचेही पुढे काहीच झाले नाही. उलट चांगले काम करण्याचे बक्षीस म्हणून दक्षता विभागाचे सहआयुक्त बैजल यांचीच बदली केली गेली. या प्रकारामुळे हे सरकार तरी चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.एसीबीचे सापळे वाढले!-ज्या न्या. लेन्टीन यांच्या शिफारशीमुळे एफडीएमध्ये दक्षता सहआयुक्त हे पद निर्माण झाले त्याचे अस्तित्वच संपवून टाकण्याचा प्रकार एफडीएमध्ये घडत आहे. याचे परिणामही आता दिसत आहेत. २००१ ते २०१७ या काळात एफडीएचे २७ अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले. त्यापैकी तब्बल ९ अधिकारी हे हर्षदीप कांबळे आयुक्त झाल्यानंतर म्हणजे जानेवारी २०१५ ते २०१७ या काळात सापडलेले आहेत. हे प्रमाण ३३ टक्क्यांच्या आसपास आहे.