शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
3
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
4
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
5
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
6
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
7
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
8
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
9
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
10
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
11
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
12
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
13
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
14
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
15
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
16
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
17
UPI युजर्ससाठी मोठी बातमी! ट्रान्झॅक्शन फेल झालं तर लगेच मिळणार रिफंड; 'या' तारखेपासून लागू होणार नियम
18
पंतचा पराक्रम, एकाच कसोटीत दोन शतकं ठोकताना केले १० विक्रम, अशी आहे संपूर्ण यादी
19
पावसाने पाठ फिरवल्याने विदर्भासह मराठवाड्यात अत्यंत भीषण अवस्था !
20
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'

कैद्यांच्या मुलांसाठी शिक्षण

By admin | Updated: July 11, 2016 00:32 IST

येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बंदीजनांच्या मुलांसाठी शिक्षण सेवा प्रकल्पांतर्गत प्रेरणापथ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे़

पुणे : येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बंदीजनांच्या मुलांसाठी शिक्षण सेवा प्रकल्पांतर्गत प्रेरणापथ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे़ यात संपूर्ण महाराष्ट्रातून २१२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व समाजातील काही मान्यवर मंडळी स्वीकारणार आहे. १४ जुलै रोजी ही बंदी बांधवांची मुले ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्यासोबत पुणे विद्यापीठातील आयुका या जगप्रसिद्ध संशोधन केंद्राला भेट देऊन या प्रकल्पाचा शुभारंभ होणार आहे. या वेळी मंगला नारळीकर या मुलांसोबत संवाद साधणार असल्याचे प्रेरणापथ प्रकल्प समन्वयक डॉ़ मिलिंद भोई आणि उदय जगताप यांनी सांगितले़ कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बंदीबांधवांच्या मुलांनी केवळ आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक परिस्थितीच्या प्रतिकूलतेमुळे शिक्षणापासून वंचित न राहता चांगले शिक्षण घेऊन सन्मानाने ताठ मानेने उभे राहावे, यासाठी शिक्षण सेवा प्रकल्प सुरू करण्यात येत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींचे मार्गदर्शन व संवाद, शैक्षणिक साहित्याची मदत, समुपदेशन, व्यवसायाभिमुख प्रशिक्षण, एन. डी. ए, यशदा, बी. जे. मेडिकल, सीओईपी, पुणे विद्यापीठ अशा संस्थांना भेटी, साहित्य, कला, संस्कृती, पोलीस, प्रशासन, चित्रपट आदी क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी आदी उपक्रमांचा यामध्ये समावेश आहे. महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेतून प्रेरणापथ हा अभिनव उपक्रम येरवडा मध्यवर्ती कारागृहात काही दिवसांपासून राबविला जात आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, लेखक डॉ. अच्युत गोडबोले, अभिनेते विक्रम गोखले, संगीतकार आनंदजी, संगीतकार प्यारेलाल, खासदार डॉ. नरेंद्र जाधव, चारुदत्त आफळे, व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर आदींचा सक्रिय सहभाग व मार्गदर्शन आहे. या वेळी डॉ. भूषण उपाध्याय, उपमहानिरीक्षक स्वाती साठे, कारागृह अधीक्षक यु. टी. पवार, दक्षता अधिकारी राजेंद्र जोशी उपस्थित होते. (प्रतिनिधी)