शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण हेच प्रगतीचे साधन : प्रकाश जावडेकर

By admin | Updated: July 11, 2016 00:58 IST

शिक्षण हे प्रगतीचे एक साधन असून ते साध्य करण्याचे मोठे आव्हान शिक्षक व सर्व समाजाने स्वीकारले पाहिजे. त्यातही विद्यार्थ्यांना एक चांगला माणूस बनविण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवर आहे

पुणे : शिक्षण हे प्रगतीचे एक साधन असून ते साध्य करण्याचे मोठे आव्हान शिक्षक व सर्व समाजाने स्वीकारले पाहिजे. त्यातही विद्यार्थ्यांना एक चांगला माणूस बनविण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवर आहे, असे मत नवनियुक्त केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले. तसेच मंत्रिपदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वी मला घडविणाऱ्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करीत मी देशातील सर्व शिक्षकांना वंदन करतो, असेही जावडेकर म्हणाले.डेक्कन एज्युकेशन सोसायटीने (डीईएस) आयोजिलेल्या गुरुप्रणाम कृतज्ञता समारंभात जावडेकर बोलत होते. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्र. ल. गावडे, डीईएसचे डॉ. अजित पटवर्धन, अनंत भिडे आदी याप्रसंगी उपस्थित होते. एमईएस व बीएमसीसीचे माजी विद्यार्थी व केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना शैक्षणिक व सामाजिक जीवनात मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. मॅनेजमेंट गुरू डॉ. प्र. चिं. शेजवलकर, प्रा. शरद वाघ, शंकर दाबके आदी गुरुजनांविषयी जावडेकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली.शिक्षणक्षेत्रातील जाड भिंती व बंद झालेली कवाडे मला उघडायची आहेत, असे जावडेकर यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे. मात्र, अलीकडच्या काळात सर्व काही आऊटसोर्स करता येते, असे पालकांना वाटते. मात्र, सर्व जबाबदारी शिक्षकांवर सोडून चालणार नाही. जे पालक आपल्या मुलांना आपुलकीने शिकवतात. ती मुले मोठी होतात, असे जावडेकर म्हणाले.माशेलकर म्हणाले, की शिक्षण ही भविष्याची गुरुकिल्ली आहे. जावडेकर हे शिक्षण क्षेत्रात चांगले काम करून आपला ठसा उमटवतील.प्र. ल.गावडे म्हणाले, की जावडेकर यांनी गुरुजनांचा सन्मान करून चांगला आदर्श घालून दिला आहे. जावडेकर हे मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळून देशाच्या शिक्षणाला वेगळी दिशा देतील.