शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

नियमबाह्य शुल्क वाढ करणाऱ्या शैक्षणिक संस्थावर कारवाई करणार - शिक्षणमंत्री विनोद तावडे

By admin | Updated: April 26, 2017 16:29 IST

खासगी शिक्षण संस्थांना दोन वर्षातुन एकदा १५ टक्के शुल्कवाढ करण्यास मुभा आहे. परंतू नियमबाह्य पद्धतीने शुल्कवाढ केल्यास

ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 21 - खासगी शिक्षण संस्थांना दोन वर्षातुन एकदा १५ टक्के शुल्कवाढ करण्यास मुभा आहे. परंतू नियमबाह्य पद्धतीने शुल्कवाढ केल्यास त्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित संस्थांवर कारवाई केली जाईल. अशी भूमिका शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केली.
 
 विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या कलचाचणी अ‍ॅप सुविधेचे उद्घाटन कासारवाडी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. उद्घाटनानंतर लगेच मुख्यमंत्री निघुन गेले. या उद्घाटन समारंभप्रसंगी शिक्षणमंत्री तावडे बोलत होते. ते म्हणाले, खासगी शिक्षण संस्थांना प्रतिवर्षी शैक्षणिक शुल्क वाढविता येणार नाही. दोन वर्षातून एकदा १५ टक्यापर्यंत शुल्कवाढ करता येईल. पालक शिक्षक संघटनेच्या पदाधिकाºयांशी समन्वय साधून संस्थांनी शुल्कवाढीचा निर्णय घ्यायचा आहे. संस्था परस्पर असा निर्णय घेऊ शकत नाही. शाळांमध्ये पालक शिक्षक संघ स्थापन करणे कायद्याने बंधनकारक केले आहे.
 
 पालक शिक्षक संघटना (पीटीए) स्थापन करून संस्थाचालक त्यांच्या मर्जीतल्या लोकांना त्यात सहभागी करतात. त्यामुळे पालकांचे प्रतिनिधी म्हणुन त्यांच्या मर्जीतील लोकांशी समन्वय साधून शुल्कवाढीचा निर्णय संस्था घेतात. हा प्रकार सर्वसामान्य पालकांसाठी अन्यायकारक आहे, असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला,त्यास उत्तर देताना तावडे म्हणाले, अवाजवी शुल्कवाढ केली जात असेल, एखाद्या संस्थेत मनमानी कारभार सुरू असेल तर पालकांनी तक्रार द्यावी. त्याची दखल घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल. 
 
कलचाचणी २०१७ या उपक्रम स्तुत्य
 
 कलचाचणी वेब पोर्टल, अ‍ॅप, हेलपलाईन सुविधेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी श्यामची आई फौंडेशनचे अध्यक्ष भारत देसडला, संचालिका शीतल बापट उपस्थित होते. महाकरिअरमित्र अ‍ॅप नावाचे हे अ‍ॅप असून महाराष्ट्र शासन आणि श्यामची आई फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम कार्यन्वीत करण्यात आला आहे. हा उपक्रम स्तुत्य असल्याचे त्यांनी नमूद केले.  शालेय शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत नेमके काय केले पाहिजे,याची निवड सोपासणारा हा सेतू आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना करिअर निवडीसाठी उपयुक्त असा उपक्रम आहे. दहावीच्या सुमारे १६ लाख,६७ हजार ४४५ विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्यात आली. सात क्षेत्रिय अभिरूची कसोटीत त्यांचा कल जाणून घेण्यात आल्याचे तावडे यांनी सांगितले.