शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण, नोकरीत जि.प. विद्यार्थ्यांना आरक्षण

By admin | Updated: December 4, 2015 01:02 IST

इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंत सलग किमान तीन वर्षांचे शिक्षण ग्रामीण भागांतील जिल्हा परिषद शाळेतून घेतलेल्यांना उच्च शिक्षण किंवा सरकारी नोकऱ्यांमध्ये पाच टक्के आरक्षण

- शैलेश वाकोडे,  बुलडाणाइयत्ता १ ली ते ८ वी पर्यंत सलग किमान तीन वर्षांचे शिक्षण ग्रामीण भागांतील जिल्हा परिषद शाळेतून घेतलेल्यांना उच्च शिक्षण किंवा सरकारी नोकऱ्यांमध्ये पाच टक्के आरक्षण देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.उच्च शिक्षणाचे प्रवेश आणि सरकारी नोकऱ्या ही केवळ शहरी भागांतील इंग्रजी माध्यमांच्या कॉन्व्हेन्ट शाळांमध्ये शिकलेल्यांची मक्तेदारी होऊ नये, यासाठी शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला असून, त्या संबंधीचा शासन निर्णय (जीआर) ११ नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आला आहे. या निर्णयानुसार राज्याच्या ग्रामीण भागांतील जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये इयत्ता १ली ते इयत्ता ७वी किंवा ८वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता १२ वी नंतरच्या शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये किंवा राज्य शासनाच्या वर्ग २, वर्ग ३ आणि वर्ग ४ च्या नोकऱ्यांमध्ये पाच टक्के आरक्षण दिले जाईल. हे आरक्षण सन २०२० पासून लागू होईल.ग्रामीण भागांतील पालकांच्या हिताच्या निर्णयाची माहिती त्यांना देण्याची जबाबदारी जिल्हा परिषद यंत्रणेची राहील, असे या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयाची कारणमीमांसा देताना ‘जीआर’ म्हणतो की, आर्थिकदृष्ट्या सक्षम पालक लठ्ठ फी भरून पाल्यांना खासगी शाळांत टाकतात, तर गरीब घरांतील पाल्यांना जि.प. शाळांमध्येच शिक्षण घ्यावे लागते. सोयीसुविधांच्या बाबतीत जि. शाळा खासगी शाळांच्या तोडीच्या नसतात.आरक्षणाचे पात्रता निकषजि. प. शाळेतून सन २०१५-१६ मध्ये व त्यानंतरच्या शैक्षणिक वर्षांत इयत्ता ७ वी किंवा इयत्ता आठवी उत्तीर्ण झालेले विद्यार्थीच या आरक्षणास पात्र ठरतील.सन २०१५-१६ पूर्वी इयत्ता ७ वी किंवा इयत्ता ८ वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अपात्र.सतत किमान तीन वर्षे ग्रामीण जी.प. शाळेत शिक्षण घेऊन इयत्ता ७ वी किंवा इयत्ता ८वी उत्तीर्ण होणे आवश्यक.आरक्षण पर्यायीनिर्णयात १२ वी नंतरचे उच्च शिक्षण आणि सरकारी नोकऱ्या यांच्यामध्ये ‘आणि’ असा शब्द न वापरता ‘किंवा’ असा शब्द वापरल्याने हे आरक्षण दोन्हींमध्ये मिळणार नाही, तर ते पर्यायी असेल, असे दिसते. मात्र हा पर्याय कधी व कसा निवडायचा याचा सुस्पष्ट खुलासा यात नाही.