शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाचाही ‘डीपी’ हवा - तावडे

By admin | Updated: June 27, 2015 02:11 IST

शहरातील लोकसंख्या जशी वाढते त्यानुसार ठरावीक कालावधीत विकास आराखडा (डीपी) तयार केला जातो; शिक्षणाबाबतही अशी संकल्पना असायला हवी.

पुणे : शहरातील लोकसंख्या जशी वाढते त्यानुसार ठरावीक कालावधीत विकास आराखडा (डीपी) तयार केला जातो; शिक्षणाबाबतही अशी संकल्पना असायला हवी. शिक्षणाचा विकास आराखडा तयार करण्यासंदर्भात राज्यातील विद्यापीठांतील अ‍ॅकॅडमिक कौन्सिलाला सूचना करणार आहोत, अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.पुण्यात विविध कार्यक्रमांनिमित्त आले असता तावडे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, की अभ्यासक्रमात कालानुरूप बदल करीत नव्या संकल्पना आणणे आवश्यक आहे. त्यामध्ये लवचिकता असायला हवी. एखाद्या अभ्यासक्रमासाठी सध्या किती मागणी आहे, उद्योगांची गरज आहे, त्याअनुषंगाने शैक्षणिक संस्थांमध्ये कोणते अभ्यासक्रम असायला हवेत याचा विचार करायला हवा. विद्यापीठांच्या अ‍ॅकॅडमिक कौन्सिलमध्ये लवचिकता आणण्याबाबत त्यांना सूचना केली जाईल. यासाठी कोणतीही समिती नेमण्याची गरज नाही. त्या त्या पातळीवर यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.कोणत्याही परीक्षेत एका प्रश्नाला एकच उत्तर ही पद्धत चुकीची असून एका प्रश्नाला अनेक उत्तरे ही पद्धतच योग्य आहे, असे तावडे यांनी सांगितले. महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप तसेच तीन मंंत्र्यांचे स्टिंग आॅपरेशन अधिवेशनात उघड करणार असल्याच्या राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिलेल्या इशाऱ्याबाबत तावडे म्हणाले, की पंकजा मुंडे यांच्याबाबत स्वत: मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सरकारचे काही चुकत असेल तर विरोधकांनी जरूर बोलावे. पण विनाकारण आरोप होत असतील तर त्यावर नक्कीच आक्षेप घेतला जाईल.