शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बेगर्स अ‍ॅक्टमधून शिक्षा गायब

By admin | Updated: November 28, 2015 01:55 IST

नव्या ‘बेगर्स अ‍ॅक्ट’मध्ये भिक्षा मागणाऱ्या व्यक्तीस शिक्षा न ठोठावण्याची तरतूद करण्यात आली आहे. शिक्षेऐवजी त्यांचे समुपदेशन करून पुनवर्सन करण्याची तरतूद करण्यात आली आहे

मुंबई : नव्या ‘बेगर्स अ‍ॅक्ट’मध्ये भिक्षा मागणाऱ्या व्यक्तीस शिक्षा न ठोठावण्याची तरतूद करण्यात आली आहे. शिक्षेऐवजी त्यांचे समुपदेशन करून पुनवर्सन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. तरीही भीक मागणाऱ्यांवर वचक राहावी, यासाठी उच्च न्यायालयाने कायद्यामध्ये कमीतकमी शिक्षेची तरतूद ठेवण्यात यावी, अशी सूचना राज्य सरकारला केली आहे.महिला सुरक्षिततेसंदर्भात उच्च न्यायालयात अनेक जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत, तर उच्च न्यायालयानेही स्वत:हून याचिका दाखल करून घेतली आहे. या सर्व याचिकांवरील सुनावणी न्या. नरेश पाटील आणि न्या. एस.बी. शुक्रे यांच्या खंडपीठापुढे होती. महिला डब्यात भिक्षा मागण्याच्या निमित्ताने काही पुरुष चढतात आणि महिलांवर हल्ला करत असल्याची बाब याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी गेल्या सुनावणीवेळी खंडपीठाच्या निदर्शनास आणली. त्यावर खंडपीठाने भीक मागणाऱ्यांचे काय करणार, अशी विचारणा राज्य सरकारकडे केली होती. त्यावर उत्तर देताना सरकारी वकील पी. काकडे यांनी जुना बेगर्स अ‍ॅक्ट रद्द करण्यात येत असून, नवा बेगर्स अ‍ॅक्ट बनविण्यात येत आहे, अशी माहिती खंडपीठाला दिली.जुन्या कायद्यात भीक मागताना एखादी व्यक्ती आढळली तर त्याला पोलीस अटक करायचे व दंडात्मक कारवाई करायचे. मात्र या नव्या कायद्यात शिक्षेची तरतूद ठेवण्यात आलेली नाही. कोणी भिक्षा मागताना आढळल्यास सरकारने नेमलेली समिती संबंधित व्यक्तीस त्यांच्याबरोबर नेईल. त्याचे यासंदर्भात समुपदेशन करेल आणि त्याचे पुनर्वसनही करण्यात येईल, अशी माहिती अ‍ॅड. काकडे यांनी खंडपीठाला दिली. ‘अशा लोकांवर कायद्याचा वचक राहिलाच पाहिजे. त्यामुळे त्यांची शिक्षेतून सुटका करू नका. नव्या कायद्यात कमीतकमी शिक्षेची तरतूद असू द्या,’ अशी सूचना खंडपीठाने राज्य सरकारला केली.दरम्यान, मध्य व पश्चिम रेल्वेने महिला डब्यांत बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीद्वारे लाइव्ह दिसणे अशक्य असल्याचे खंडपीठाला सांगितले. आतापर्यंत सीसीटीव्हीमध्ये असलेला डाटा संध्याकाळी पाहणे शक्य होते. मात्र चालत्या ट्रेनच्या डब्यात सुरू असलेल्या हालचाली सीसीटीव्हीद्वारे पाहणे अशक्य आहे. कारण सेटलाईटद्वारे लाइव्ह दिसणे अशक्य आहे. तशी अत्याधुनिक यंत्रणा मध्य व पश्चिम रेल्वेकडे नाही, असे रेल्वेच्या वकिलांनी खंडपीठाला सांगितले. गुन्हा घडल्यानंतर काय झाले, हे सीसीटीव्हीद्वारे पाहण्याऐवजी गुन्हा घडत असतानाच यंत्रणेच्या निदर्शनास आला तर काही अप्रिय घटना घडण्यापूर्वीच रोखता येतील, असे मत खंडपीठाने गेल्या सुनावणीवेळी व्यक्त केले होते. (प्रतिनिधी)