- मयुर गोलेच्छा ल्ल लोणार (बुलडाणा)दोन वर्षांपूर्वी राज्यभरातील सर्वच तालुक्याच्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेली व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सुविधा तांत्रिक अडचणीमुळे वर्षभरापासून बंद आहे. त्यामुळे गटशिक्षण अधिकाऱ्यांना बैठकांसाठी वेळोवेळी जिल्हा मुख्यालय गाठावे लागत आहे.व्हिडीओ कॉन्फरन्सिंगसाठी प्रत्येक तालुका स्तरावर व्हिडीओ कॉन्फरन्सिंग युनिट बसविण्यासाठी एका कंपनीला कंत्राट देण्यात आले होते. पूर्वी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगसाठी जिल्हा स्तरावर जावे लागत होते. हे लक्षात आल्याने शासनाने लाखो रुपये खर्च करून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी स्वतंत्र व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सुविधा कार्यान्वित केली. त्यामुळे गटशिक्षण अधिकाऱ्यांना तालुका स्तरावरूनच आयुक्त, संचालक, उपमहासंचालक यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमार्फत थेट संभाषण करण्यासोबतच राज्यस्तरावरून तज्ञांद्वारे शिक्षकांचे विशेष प्रशिक्षण, राज्यस्तरावरून राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा आढावा देण्यासाठी सुविधा झाली. त्यामुळे वेळेची बचत आणि शिक्षण विभागातील कामांना गती प्राप्त झाली होती; मात्र वर्षभरापासून कंत्राट घेतलेल्या कंपनीने योग्य सुविधा न पुरविल्याने तांत्रिक अडचणी निर्माण होऊन राज्यातील सर्वच तालुका स्तरावरील व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सुविधा बंद पडली.तालुकास्तरावरील व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सुविधेमुळे कामे सोयीची झाली होती. लाखो रुपये खर्च करून लावलेली ही सुविधा पुन्हा कार्यान्वित करण्याची गरज आहे. - दादाराव मुसदवाले, गटशिक्षण अधिकारी, लोणार
शिक्षण विभागाचे ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ बंद
By admin | Updated: October 9, 2015 02:25 IST