शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण खात्याने केला ‘ध’चा ‘मा’!

By admin | Updated: January 31, 2016 01:48 IST

राज्यातील माध्यमिक शाळांतील ग्रंथपालांना पदवीधर वेतनश्रेणी देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या शिक्षण खात्याने संदर्भ एका याचिकेचा आणि वेतनश्रेणी मात्र भलतीच असा अजब प्रकार केला.

नााशिक : राज्यातील माध्यमिक शाळांतील ग्रंथपालांना पदवीधर वेतनश्रेणी देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या शिक्षण खात्याने संदर्भ एका याचिकेचा आणि वेतनश्रेणी मात्र भलतीच असा अजब प्रकार केला. खात्याच्या ‘ध’च्या ‘मा’ मुळे न्यायालयात गेलेल्या ग्रंथपालांवर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली आहे.राज्यातील अनुदानित माध्यमिक शाळांमधील पदवीधर ग्रंथपालांना दहावी उत्तीर्णच्या आधारावर वेतनश्रेणी दिली जात असून, त्यामुळे अन्याय होत असल्याची भावना ग्रंथपालांमध्ये निर्माण झाली होती. सर्वप्रथम शोभू शंकर चव्हाण यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. पदवीधर ग्रंथपालांना त्यानुसार बीएड समकक्ष वेतनश्रेणी लागू करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. २००६ मध्ये याचिकेच्या आधारे राज्यातील अन्य ग्रंथपालांनी याचिका दाखल केल्या आणि उच्च न्यायालयाने त्यानुसार सर्वांनाच न्याय दिला. राज्य शासनाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेले अपील फेटाळले असून, पुनर्विलोकन याचिकाही फेटाळली आहे. तरीही सरकारने सर्व ग्रंथपालांना वेतनश्रेणी लागू तर केली नाहीच, परंतु न्यायालयाने निकाल दिलेल्या अन्य साडेतीनशे ग्रंथपालांनादेखील पदवीधर वेतनश्रेणी लागू केलेली नाही. त्यामुळे दीडशेहून अधिक अवमान याचिका शासनाच्या विरोधात दाखल आहेत. सरकारने त्यातील काही याचिकाकर्त्यांना घाईघाईने सुधारित वेतनश्रेणी देण्याचे अध्यादेश काढले असून, त्यांना शोभू चव्हाण यांच्या याचिकेचा संदर्भ दिला आहे. चव्हाण यांना पदवीधर वेतनश्रेणी देण्याचे न्यायालयाचे आदेश असताना या खटल्याच्या निकालाचा संदर्भ देऊन प्रत्यक्षात मात्र पदविकाधारकांची वेतनश्रेणी देण्याचे आदेश निघत आहेत, अशी तक्रार महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने केली आहे. (प्रतिनिधी)उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही शिक्षण खाते चुकीचे अध्यादेश काढून ग्रंथपालांवर अन्याय करीत आहेत. उच्च न्यायालयात चुकीचे अध्यादेश सादर करून दिशाभूल करीत आहेत. त्यामुळे सरकारविरोधात न्यायालयीन लढा द्यावा लागेल. विशेष म्हणजे न्यायालयात जाणाऱ्यांनाच वेतनश्रेणी, ही शासनाची भूमिका अन्य ग्रंथपालांवर अन्याय करणारी आहे.- विलास सोनार, याचिकाकर्ता