शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विद्यार्थीकेंद्री करावे

By admin | Updated: May 16, 2016 04:30 IST

आपली शिक्षण व्यवस्था ही अधिकाधिक विद्यार्थीकेंद्री करण्यावर भर राहील, असे प्रतिपादन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले.

मुंबई : विद्यार्थ्यांच्या मार्कलिस्टवरील नापास हा शिक्का पुसण्याचे काम आम्ही प्राधान्याने करणार आहोत, ते करताना विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांचा व कौशल्याचा विकास करण्याकडेही विशेष लक्ष देण्यात येईल. एकूणच आपली शिक्षण व्यवस्था ही अधिकाधिक विद्यार्थीकेंद्री करण्यावर भर राहील, असे प्रतिपादन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले.मुंबई मराठी पत्रकार संघाच्या मुख्य सभागृहात शनिवारी सायंकाळी भीमराव भोयर यांच्या ‘शिक्षणवाटा चोखाळताना’ या पुस्तकाचे प्रकाशन शिक्षणमंत्री तावडे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी तावडे बोलत होते. या वर्षीपासून दहावीप्रमाणेच बारावीच्या विद्यार्थ्यांचीदेखील पुरवणी परीक्षा निकालानंतर एका महिन्यात घेतली जाणार आहे, असे तावडे म्हणाले.या कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके, आमदार कपील पाटील, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय संघटक श्याम मानव, पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनाचे अरुण जाखडे यांच्यासह शिक्षण व प्रसारमाध्यम क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)>येत्या २७ ते ३० मेदरम्यान दहावीच्या परीक्षेचा निकाल लावण्याचा प्रयत्न असून, एका महिन्यानंतर नापास विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा घेतली जाणार आहे. >विशेष म्हणजे या वर्षीपासून फेरपरीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे समुपदेशन करण्यात येणार असून, त्याआधारे या सर्व विद्यार्थ्यांना त्यांचा कल लक्षात घेऊन कौशल्य विकास प्रशिक्षणांतर्गत विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती विनोद तावडे यांनी दिली.