शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

राज्यासाठी लवकरच शिक्षण हक्क कायदा

By admin | Updated: April 20, 2015 02:03 IST

शिक्षण हक्क कायद्यातील काही तरतुदींबाबत संदिग्धता असून त्याचा अभ्यास केला जाईल. त्यानुसार काही दुरुस्त्या करून राज्यासाठी स्वतंत्र कायदा तयार केला जाईल

पुणे : शिक्षण हक्क कायद्यातील काही तरतुदींबाबत संदिग्धता असून त्याचा अभ्यास केला जाईल. त्यानुसार काही दुरुस्त्या करून राज्यासाठी स्वतंत्र कायदा तयार केला जाईल, अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी येथे दिली.‘शिक्षण हक्क कायदा २००९’(आरटीई) मध्ये ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेशासाठी २५ टक्के जागा आरक्षित ठेवणेही आवश्यक आहे. मात्र, हे प्रवेश पहिलीपासून की पूर्व प्राथमिकपासून द्यायचे यावरून सध्या शासन व संस्थाचालकांमध्ये जुंपली आहे. त्याविषयी तावडे म्हणाले, ‘आरटीई’बाबत काही प्रमाणात संदिग्धता आहे. त्यामुळे राज्यासाठी स्वतंत्र कायदा करून त्यात ६ ते १४ वयोगट निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे पूर्व प्राथमिकचा काहीच संंबंध येत नाही. पूर्व प्राथमिक हा केंद्र सरकारचा विषय असून त्याच्याशी राज्याचा संबंध नाही. तसेच सीबीएसई व आयसीएसई या केंद्रीय मंडळाच्या शाळांमध्ये पूर्व प्राथमिक प्रवेशाशी संबंधिताच्या अधिक तक्रारी आहेत. त्यामुळे शाळांना शुल्क परतावा देता येणार नाही. तसेच शिक्षण विभागाच्या तिजोरीत तेवढा निधीही उपलब्ध नाही. या शाळांना निधी मंजूर करून उपलब्ध करून दिल्यास ग्रामीण भागातील शाळांना निधी देता येणार नाही. त्यातून आता न्यायालयच मार्ग काढू शकेल, असेही विनोद तावडे म्हणाले.काही शाळा ‘आरटीई’नुसार प्रवेश देण्यास टाळाटाळ करीत आहेत. तसेच अवाजवी शुल्क वाढविल्याच्याही अनेक तक्रारी शासनाकडे येत आहेत. त्यावर कायदा न पाळणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करण्याचा अधिकार शासनाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)