शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या नावे चिठ्ठी लिहून सुशिक्षित शेतकऱ्याची आत्महत्या

By admin | Updated: September 12, 2015 01:51 IST

शेतकऱ्यांबाबतच्या शासकीय धोरणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत मालेगाव तालुक्यातील एका सुशिक्षित, युवा शेतकऱ्याने गरुवारी रात्री आत्महत्या केली. मुख्यमंत्र्यांसह पोलीस

वाशिम : शेतकऱ्यांबाबतच्या शासकीय धोरणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत मालेगाव तालुक्यातील एका सुशिक्षित, युवा शेतकऱ्याने गरुवारी रात्री आत्महत्या केली. मुख्यमंत्र्यांसह पोलीस आणि आप्तेष्टांच्या नावे वेगवेगळी पत्रं लिहून या शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे मुख्यमंत्री अशाच प्रकारे दुर्लक्ष करीत राहिले, तर शेतकरी आत्महत्या होतच राहतील, अशी भीती या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.अस्मानी व सुल्तानी संकटामुळे शेतकरी खचून गेला आहे. याच कारणामुळे मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे येथील दत्ता आत्माराम लांडगे या युवा शेतकऱ्याने गुरुवारी रात्री आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये त्याने विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्यांकडे आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला आहे. विदर्भातील शेतकरी दुष्काळाला घाबरत नाही; पण शेतीसाठी लागणारी साधने, भांडवल नसल्याने शेतकरी वैतागला आहे. पाणी आहे, पण वीज नाही. त्याचप्रमाणे मेहनत करायची इच्छा आहे, पण पुरेसे भांडवल नाही, असे त्याने नमूद केले आहे.आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबास एक लाखाची मदत दिली जाते. शासकीय कर्मचाऱ्यासाठी हा एक महिन्याचा पगार आहे, तर उद्योगपतीसाठी ती एक दिवसाची कमाई आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या सर्व कुटुंबांना शासनाने मासिक १0 हजार रुपये वेतन द्यावे, अशी अपेक्षाही या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे. दत्ताकडे १२ एकर शेती असून, त्याला एक भाऊ, एक बहीण, आई, वडील, पत्नी आणि मुलगा आहे. त्याने पत्नी तसेच आप्तेष्टांसाठी लिहिलेल्या पत्रांतून आपल्या आत्महत्येसारख्या कृत्याबाबत क्षमा मागितली आहे.