शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

बच्चन, शाहरुख, देवगण, जुही यांना ईडीच्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 23:25 IST

चित्रपट कलावंत अमिताभ बच्चन, अजय देवगण तसेच शाहरुख खान तसेच जुही चावला यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) आर्थिक व्यवहारांसंदर्भात नोटिसा बजावल्या आहेत.

नवी दिल्ली : चित्रपट कलावंत अमिताभ बच्चन, अजय देवगण तसेच शाहरुख खान तसेच जुही चावला यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) आर्थिक व्यवहारांसंदर्भात नोटिसा बजावल्या आहेत. ईडीने अमिताभ बच्चन व त्यांच्या कुटुंबातील प्रत्येकाकडून १३ वर्षांत परदेशामध्ये पाठविलेल्या पैशाची माहिती मागितली आहे. अभिनेता अजय देवगण यालाही भारताबाहेर पाठविलेल्या पैशाचा तपशील सादर करण्यास सांगितले आहे. फेमा कायद्यानुसार तपासणी करण्याआधी ईडीतर्फे नोटीस संबंधितांना बजावली जाते आणि त्यांच्याकडून आवश्यक ती माहिती मागवण्यात येते. अमिताभ बच्चन आणि त्याच्या परिवाराला २00४ नंतर परदेशांमध्ये व्यावसायिक दौऱ्यांत केलेल्या आर्थिक व्यवहारांची माहिती देण्यास सांगितले आहे. शाहरूखला आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्सकडून झालेल्या परकीय चलन कायद्याच्या उल्लघंनप्रकरणी यापूर्वी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्याला २३ जुलला ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. नाईट रायडर्स स्पोटर््स प्रायव्हेट लिमिटेडचे समभाग मॉरिशसमधील कंपनीला मूळ किंमतीपेक्षा कमी भावात विकण्यात आले. त्यामुळे कंपनीला ७३.६ कोटी रूपयांचा तोटा झाला. याप्रकरणी मार्चमध्ये ईडीने शाहरूख, पत्नी गौरी खान, अभिनेत्री जुही चावला व अन्य काही जणांना या नुकसानासाठी नोटीस पाठवली होती. कोलकाता नाईट रायडर्सची मालकी नाईट रायडर्स स्पोटर््स प्रायव्हेट लिमिटेडकडे आहे. (वृत्तसंस्था)समभाग स्वस्तात- शाहरुख खाने २००८-०९ मध्ये या कंपनीचे काही समभाग आपल्याच भागीदाराला स्वस्तात विकले. एक समभाग ७० ते ८६ रुपयांना विकायला हवा होता. तो त्याने जय मेहता यांच्या सी आयलंड इन्व्हेस्टमेन्टला दहा रुपयांना विकला. या व्यवहारात अनियमितता असून, समभाग मूल्यांकनाच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन झाले असल्याचे ईडीचे म्हणणे आहे.