शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ईडी आता छगन भुजबळांनाही बोलावणार

By admin | Updated: February 27, 2016 02:28 IST

महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणात सक्त वसुली संचालनालय (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना त्यांच्याविरोधात पुरावे गोळा केल्यानंतर चौकशीच्या

- डिप्पी वांकाणी,  मुंबईमहाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणात सक्त वसुली संचालनालय (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना त्यांच्याविरोधात पुरावे गोळा केल्यानंतर चौकशीच्या शेवटच्या टप्प्यात बोलावील. या प्रकरणात ईडीने भुजबळ यांचा मुलगा पंकज व पुतण्या समीर याची चौकशी केली आहे.ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणात आधीच आरोपपत्र दाखल केले असून, याच प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी ईडीला सहा महिने लागतील. दाखल झालेले आरोपपत्र मराठीत असून, त्याचे इंग्रजीमध्ये भाषांतर केले जाईल. भाषांतरानंतर ईडीचे अधिकारी स्वत:च्या आणि एसीबीच्या निष्कर्षांमध्ये तुलना करून काही आरोपींना पुन्हा चौकशीसाठी बोलावतील. आम्हाला हा खटला अतिशय अचूक करायचा आहे.आम्ही सगळे पुरावे गोळा केल्यानंतर आमच्या चौकशीच्या शेवटच्या टप्प्यात आणि सगळे प्रश्न विचारण्यासाठी छगन भुजबळ यांना बोलावू, असे हा अधिकारी म्हणाला. आधी आम्ही आरोपपत्र इंग्रजीमध्ये भाषांतर करून घेऊन त्यातील तपशिलाचा अभ्यास करू. एसीबीच्या आरोपपत्रात काही मुद्दे आलेले नाहीत, असे आम्हाला आढळल्यास आम्ही काही आरोपींना पुन्हा बोलावून घेऊन ते प्रश्न त्यांना विचारू. ही सगळीच प्रक्रिया वेळ लागणारी असल्यामुळे या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी आम्हाला सहा महिने लागतील, असे त्याने सांगितले. समीर भुजबळ हा मी सामाजिक कार्यकर्ता आणि राजकीय नेता असल्यामुळे त्याच्या कंपन्यांमधील अनियमितांबद्दल मला काही माहिती नाही, असे सांगत आला आहे. परंतु त्याच्याविरोधात आमच्याकडे पुरेसे पुरावे असल्याचे संकेत या अधिकाऱ्याने दिले.महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणात एसीबीने दाखल केलेल्या आरोपपत्रात छगन भुजबळ यांनी इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीच्या बैठकांमध्ये अनेक वस्तुस्थिती दडवून ठेवल्याचे आणि अशा बैठकांमध्ये उपस्थित असलेले मुख्य सचिव आणि अर्थ सचिव यांच्या निवेदनांचा तपशील आरोपांना बळकटी देण्यासाठी देण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे तत्कालीन अधिकारी यांना या प्रकरणात आरोपी करण्यात आले असले तरी या गैरव्यवहारात त्यांना कसा फायदा झाला आहे हे एसीबी आरोपपत्रात सिद्ध करू शकलेली नाही.