शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

ईडीकडून एका बँकेचे आक्षेपार्ह दस्तावेज जप्त

By admin | Updated: December 22, 2016 20:42 IST

हजार-पाचशे रुपयांच्या नोटाबंदीच्या काळात अकोल्यातील बँकांनी काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न केला

ऑनलाइन लोकमतअकोला, दि. 22 - हजार-पाचशे रुपयांच्या नोटाबंदीच्या काळात अकोल्यातील बँकांनी काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न केला का, याची शहानिशा करण्यासाठी पाच दिवसाआधी ईडीचे (इन्फोर्समेंट डायरेक्टरेट)अंमलबजावणी संचालनालयाचे ४ सदस्यीय पथक अकोल्यात चौकशी करून गेले. अकोला-वाशिम जिल्ह्यात कोट्यवधीची उलाढाल असलेल्या एका नामांकित बँकेत ईडीच्या पथकाने तीन दिवस झाडाझडती घेतली. येथे आढळलेले आक्षेपार्ह दस्तावेजही या पथकाने जप्त केले. तीन बँकांची झालेली झाडाझडती आणि त्यातील एका बँकेचे आक्षेपार्ह दस्तावेज जप्तीमुळे बँक क्षेत्रातील वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. नोटाबंदीनंतर देशभरात झालेल्या आर्थिक उलाढालीवर ईडीचे लक्ष होते. त्यातून ईडीच्या या अधिकाऱ्यांनी अकोल्यातील तीन नामांकित बँकेला अकस्मात भेट देऊन ही कारवाई केल्याने अनेक बँकांची यंत्रणा हादरली आहे. स्वत:चे आयकार्ड दाखवून या चारही अधिकाऱ्यांनी बँकेतील वरिष्ठांची भेट घेतली. नोटाबंदीनंतर ज्या बँक खात्यात दोन लाख रुपयांच्या वर रकमा जमा झाल्यात, अशा खातेदारांची माहिती त्यांनी घेतली. त्यानंतर हजार-पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा कोणाच्या खात्यात जमा झाल्यात त्यांची माहिती टिपली गेली.एसबीआयकडून आलेल्या नवीन नोटांचे विनिमय कसे केले गेले, याची माहितीही या अधिकाऱ्यांनी घेतली. व्यवस्थापकांशी, आणि बँक पदाधिकाऱ्यांशीदेखील या पथकाने संवाद साधला; मात्र अत्यंत गोपनीयतेत ही झाडाझडती घेतली गेली. बँक स्ट्राँग रूममधील रक्कम आणि बँक खात्यातील रकमेचा हिशेब तपासून पाहिला. जेथे तफावत आढळली. तेथील व्यवस्थापकांसह संबंधित खात्यांची सखोल चौकशी केली. तीन बँकांपैकी एका बँकेतील आर्थिक व्यवहारात फारसे दोष आढळले नसून एका बँकेत काही रुपयांची तफावत आढळून आली. ज्या बँकेत मोठी तफावत आढळून आली तेथील आक्षेपार्ह दस्तावेज ईडीच्या पथकाने आधीच जप्त केले. आता या चार पथकीय अधिकाऱ्यांच्या अहवालानंतर पुन्हा बँकेची चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तिन्ही बँकेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला. बँकेच्या एका पदाधिकाऱ्यांनी मात्र यास दुजोरा दिला; मात्र कोणतीही माहिती त्यांनी दिली नाही.