शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

ईडीने आस्थापनेवर छापा टाकलेला नाही

By admin | Updated: June 25, 2015 01:39 IST

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आमच्या कोणत्याही आस्थापनेवर छापा टाकलेला नसताना असे छापे घातले गेल्याचे जाहीर करण्यात आले आहे

मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आमच्या कोणत्याही आस्थापनेवर छापा टाकलेला नसताना असे छापे घातले गेल्याचे जाहीर करण्यात आले आहे. हा केवळ बदनामीचा प्रकार असून कोणत्याही तपासास सामोरे जाण्याची आमची तयारी आहे, असा खुलासा माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. एखाद्या इव्हेंटसाठी प्रायोजकत्व घेणे गुन्हा नाही. त्यांच्याशिवाय अनेक कंपन्यांकडून नाशिक फेस्टिव्हलसाठी देणग्या दिल्या होत्या. त्यात महिंद्रा, सारस्वत बँक, सिंडीकेट बँक यांचाही समावेश होता. इंडिया बूलला कालिना येथील भूखंड देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीचा आहे. त्याचा या प्रायोजकत्वाशी संबंध जोडणे हा तर्कदुष्ट प्रकार असल्याचे भुजबळ यांचे म्हणणे आहे.नवी मुंबईतील बांधकाम प्रकल्पाबाबत समीर भुजबळ यांना विचारणा केली आहे. त्यानुसार आमच्या बांधकाम कंपन्या आहेत. मुंबईत आणि नवी मुंबईत इमारती बांधून त्यात फायदा सुध्दा मिळवला आहे. अनेक प्रकल्पात अनेकजण पैसे गुंतवतात. नको असेल तर पैसे परत नेतात. आकृती, डी.बी. रिएलिटी, काकटे यांनी या संदर्भात एकही पैसा दिलेला नाही. दुसऱ्याने दिले ते त्याचे शासकीय कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यापूर्वीच परत नेले. तिसऱ्याने उशिरा पैसे नेले, असेही भुजबळ यांनी म्हटले आहे.महाराष्ट्र सदन हे प्रकरण झोपडपट्टी पुनर्विकास योजनेशी संबंधित आहे. के. एस. चमणकर यांना अंधेरी येथील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प करण्यासाठी तेथील झोपडपट्टीवासीयांनी नियुक्त केले होते. त्यांच्या प्रस्तावात २००४ सालापूर्वीच झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने मंजुरीही दिली होती. त्या प्रकल्पातील थोड्या मोकळ्या जागेचा एफएसआय हा टीडीआरच्या स्वरुपात देऊन त्याचे मूल्य पैशाच्या स्वरूपात न घेता त्यातून शासकीय इमारती बांधून घेण्याचा प्रस्ताव शासनाच्या पायाभूत समितीने मंजूर केला. या प्रस्तावसाठी द्यावयाचा टीडीआर नगरविकास विभागाने द्यायचा होता. त्याच्याशी आपला दूरान्वयेही संबंध नव्हता. आपण ना एफएसआय दिला ना टीडीआर दिला ना जमीन दिली. ना सरकारचे पैसे दिले कारण तो अधिकार माझा नव्हता. त्यासाठी मी पैसे घेण्याचा प्रश्नच येत नाही, असेही भुजबळ यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)