शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

ईडीचेही आरोपपत्र

By admin | Updated: March 31, 2016 02:01 IST

महाराष्ट्र सदन बांधकाम आणि खारघर येथील हेक्स वर्ल्ड प्रकरणात सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) विशेष हवाला व्यवहार प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) न्यायालयात ५३ जणांविरुद्ध

- डिप्पी वांकाणी, मुंबईमहाराष्ट्र सदन बांधकाम आणि खारघर येथील हेक्स वर्ल्ड प्रकरणात सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) विशेष हवाला व्यवहार प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) न्यायालयात ५३ जणांविरुद्ध ११ हजारांपेक्षा जास्त पानांचे आरोपपत्र दाखल केले. या ५३ जणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, त्यांचा मुलगा पंकज आणि पुतण्या समीर भुजबळ तसेच राज्यसभा सदस्य व काकडे इन्फ्रास्ट्रक्चरचे संजय काकडे, असिफ बलवा आणि डी. बी. रियल्टी ग्रुपचे विनोद गोयंका यांचा समावेश आहे. या प्रकरणात ईडीने १३१.८६ कोटी रुपयांची मालमत्ता ताब्यात घेतली आहे. छगन, पंकज व समीर भुजबळांनी ८७० कोटी रुपयांची मालमत्ता जमविली असून या वरील १३१.८६ कोटी रुपये किमतीच्या मालमत्तेचा बाजारभाव ३४० कोटी रुपये आहे. ११ हजारांपेक्षा जास्त पानांचा आरोपपत्राचा संच, आरोपपत्र असलेल्या काही सीडीज् न्यायालयास सादर करण्यात आल्या. ५३ आरोपींवर हवाला प्रतिबंधक कायद्याचे कलम तीन आणि चार अन्वये आरोप ठेवण्यात आले आहेत.आम्ही अजूनही चौकशी करीत आहोत आणि पुरवणी आरोपपत्रही लवकरच सादर करणार आहोत. या पुरवणी आरोपपत्रात भुजबळांनी (विशेषत: सिंगापूर आणि इंडोनेशियात) केलेल्या आंतरराष्ट्रीय व्यवहारांचा तपशील असेल, असे सांगून ईडी अधिकारी म्हणाले की, छगन भुजबळ कट रचणारे व पंकज व समीर त्यांना साह्य करणारे असून, भुजबळांकडून या दोघांनी सूचना घेतल्या होत्या. त्यांचा चार्टर्ड अकाउंटंट सुनील नाईक याने छगन भुजबळांविरुद्ध केलेली निवेदने हे मुख्य पुरावे आहेत. भुजबळांनी स्थापन केलेल्या कंपन्यांमध्ये पैसे ओतण्यासाठी कोलकाता येथील आर्थिक कंपन्यांना रोख पैसे देऊन त्यांच्याकडून धनादेश (चेक्स) घेण्याचे काम मी केल्याचे नाईक याने मान्य केले आहे. अमित बलराज याने छगन भुजबळांच्या उपस्थितीत एमईटीच्या वांद्रे कार्यालयात कोट्यवधी रुपये कसे आणले गेले याचा सगळा तपशील दिला. याशिवाय व्यवसाय न करणाऱ्या व वेगवेगळ्या आर्थिक व्यवहारांसाठी वापर केल्या जाणाऱ्या कंपन्यांचे (शेल कंपन्या) आयकराचे अहवाल व रजिस्ट्रार आॅफ कंपनीज्च्या (भुजबळांनी स्थापन केलेल्या कंपन्यांचे तपशील दिले) अहवालांत संचालक कसे बदलले गेले आणि भागभांडवल कसे वाढविले गेले, तसेच बँक खात्यांचा तपशील दिला गेला, यातून कंत्राटदारांनी दिलेल्या लाचेचा (किकबॅक्स) तपशील मिळतो. आरोपपत्रात हेच पुरावे आहेत, असे ईडीच्या सूत्रांनी सांगितले.काकडे, गोयंका आणि बलवा यांना का आरोपी करण्यात आले आणि त्यांच्यावर आरोपपत्र का ठेवण्यात आले, असे विचारले असता, अधिकाऱ्याने सांगितले की, वांद्रे येथील भूखंडावर भुजबळांच्या कंपन्यांतर्फे करण्यात येत असलेल्या बांधकामात त्यांनी मोठी गुंतवणूक केली होती.पुरवणीही येणारकलिना सेंट्रल लायब्ररी प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल केलेल्या आरोपपत्राचा ईडी अभ्यास करीत आहे आणि त्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या माहितीच्या आधारे पुरवणी आरोपपत्र दाखल करेल. याबाबत ईडी सिंगापूर आणि इंडोनेशियाला विनंतीपत्र लिहून भुजबळांनी तेथे केलेल्या सर्व व्यवहारांची माहिती मागविणार आहे. भुजबळांची आणखी मालमत्ता जप्त केली जाईल.१०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर : केवळ १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करार करून आणि कुठलीही अधिकृत रजिस्ट्री न करता भुजबळांनी त्यांच्या कंपन्यांसाठी प्रचंड पैसा मिळविला. त्यात डी.बी. रियल्टी ५ कोटी, बलवा ग्रुप आॅफ कंपनीतर्फे २० कोटी आणि काकडे इन्फ्रास्ट्रक्चरतर्फे १० कोटी रुपये यांचा समावेश आहे.