शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

अर्थव्यवस्थादेखील बिघडायला लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2016 02:28 IST

गहू, उस, कांदा, बटाट्याचे भाव पार पडले आहेत, असे आताच्या राज्यकर्त्यांना कोणी सांगितले तर त्यांच्याकडून उत्तर येते, की एका दृष्टीने बरे झाले

मंचर : गहू, उस, कांदा, बटाट्याचे भाव पार पडले आहेत, असे आताच्या राज्यकर्त्यांना कोणी सांगितले तर त्यांच्याकडून उत्तर येते, की एका दृष्टीने बरे झाले, खाणाऱ्याची सोय झाली. देशातील ५२ टक्के लोकसंख्या शेतीच्या क्षेत्रात आहे व या राज्यकर्त्यांचा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मार्ग काढण्याचा दृष्टिकोन नाही. त्यामुळे आज शेतकरी पूर्ण अडचणीत सापडला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थादेखील बिघडायला लागली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.मंचर येथे शेतकरी मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, जुन्नर तालुक्याचे माजी आमदार वल्लभ बेनके, शिरूर तालुक्याचे माजी आमदार सूर्यकांत पलांडे, पोपटराव गावडे, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, विष्णूकाक हिंगे इत्यादी उपस्थित होते. पवार म्हणाले, मोदींची ‘मन की बात’ आपण ऐकतो, मात्र आपली बात काही त्यांच्या नजरेत आली, असे दिसत नाही. देशातील ५२ टक्के लोकसंख्या शेतीच्या क्षेत्रात आहे. या व्यवसायात असलेल्या माणसाची आर्थिक ताकद व्यवस्थित राहिली नाही तर देशाची अर्थव्यवस्था नीट रहात नाही. देश पुढे न्याययचा असेल, परिवर्तन करायचे असेल तर पहिले लक्ष्य ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडे द्या, हे मोदीसाहेबांना सांगण्याची गरज आहे. नोटाबंदीनंतर जिल्हा बँकेत ४,५०० कोटी रुपये जमा झाले. राज्याच्या बँकेत ७०० कोटी रुपये जमा झाले. एकंदर ५,२०० कोटी जमा झाले. मात्र केंद्राने हे ५,२०० कोटी रुपये घेण्यास नकार दिला. हा पैसा अजूनही बँकेकडे पडून आले. हा पैसा स्वीकारा, अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या असतानाही आज दहा दिवस झाले तरी हे सरकार स्वीकारत नाही. सामान्य लोकांच्या या बँकेवर सरकारचा विश्वास नाही, यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. यावेळी वळसे पाटील म्हणाले, कृषी मंत्री असताना देशाला व शेतकऱ्यांना वाचविण्याचे काम शरद पवार यांनी केले. मात्र सध्या शेतात पीक आहे पण भाव नाही. मागील वर्षीच्या दुष्काळात शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका केंद्र व राज्य सरकारने घेतली नाही. यावेळी देवदत्त निकम यांनी शेतकऱ्यांपुढील अडचणी व मागण्या मांडल्या. यावेळी शरदराव शिंदे यांनी सुत्रसंचालन केले. (वार्ताहर)