शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक-सामाजिकचा घोळ

By admin | Updated: July 20, 2014 01:12 IST

आर्थिक व सामाजिक जनगणनेच्या कामाचा नागपूर जिल्ह्यात या कामासाठी नियुक्त सरकारी यंत्रणा आणि केलेल्या एका खाजगी कंपनीच्या असमन्वयामुळे घोळात घोळ सुरू आहे. हे काम सहा महिन्यात पूर्ण करायचे होते,

जनगणना : सहा महिन्यांचे काम तीन वर्षांनंतरही अपूर्णचंद्रशेखर बोबडे - नागपूरआर्थिक व सामाजिक जनगणनेच्या कामाचा नागपूर जिल्ह्यात या कामासाठी नियुक्त सरकारी यंत्रणा आणि केलेल्या एका खाजगी कंपनीच्या असमन्वयामुळे घोळात घोळ सुरू आहे. हे काम सहा महिन्यात पूर्ण करायचे होते, मात्र तीन वर्षे पूर्ण होऊनही अद्याप ते होऊ शकले नाही.जिल्ह्यात सप्टेंबर २०११ पासून या कामाला सुरुवात झाली. मार्च २०१२ पर्यंत ते पूर्ण करायचे होते. मात्र या कामाला वेळोवेळी कंपनीच्या असहकार्याचा फटका बसला. अनेक अडचणींना तोंड देत व रखडत रखडत का होईना फेब्रुवारी २०१४ पर्यंत काम अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचले होते. मात्र पुन्हा ते रखडले असून सध्या ते बंद आहे. नागपूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या देखरेखीत जि.प. ग्रामीण विकास यंत्रणाकडूून हा कार्यक्रम राबविण्यात आला. काम अंतिम टप्प्यात असताना कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करण्यात आले. सध्या हे काम प्रकल्प संचालकांनी करायचे की जिल्हाधिकारी कार्यालयाने, याबाबत शासनाने स्पष्ट सूचना दिली नाही, त्यामुळे संभ्रम कायम आहे.कामाचे स्वरूप अत्यंत किचकट आहे. कंपनीच्या प्रतिनिधींनी नोंदणी करताना अनेक चुका केल्या. त्या दुरुस्त केल्यानंतर अंतिम फाईल्स तयार करण्यात आल्या. विशेष म्हणजे सर्व काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सर्व जिल्ह्यांनी सादर केले होते. आता नव्याने फाईल्समध्ये त्रुटी (व्हेरिफिकेशन फाईल्स) निर्माण होत आहेत. वर्धा जिल्हा १४३, नागपूर जिल्हा ३४६, भंडारा १०८, गोंदिया १२५, गडचिरोली ७८ आणि चंद्रपूर जिल्ह्यात २०९ अशाप्रकारच्या फाईल्स तयार झाल्या आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवामुक्त केल्याने त्रुटी कोण दूर करणार, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. या कामासाठी नेमलेल्या प्रगणकांना अद्याप त्यांचे मानधन मिळाले नाही. या कामासाठी महापालिकेने ४५० प्रगणक आणि १६० पर्यवेक्षक नियुक्त केले होते. त्यांना त्यांच्या कामाचे निम्मेच मानधन देण्यात आले. या कामासाठी शहराला एक कोटी तर पुढच्या कामासाठी तेवढ्याच निधीची गरज आहे.