शहरं
Join us  
Trending Stories
1
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
2
तामिळनाडूत हिंदी गाणी, चित्रपट आणि जाहिरातींवर बंदी; स्टॅलिन सरकारने आणले विधेयक
3
'निवडणूक आयोगाची वेबसाईट बाहेरुन कोण तर चालवतंय', जयंत पाटलांचा गंभीर आरोप
4
"माझ्या नवऱ्याला मार, नाहीतर मी..."; ५ मुलांच्या आईचा हट्ट, बॉयफ्रेंडपेक्षा १२ वर्षांनी आहे मोठी
5
“माओवाद १०० टक्के संपणार, भूपतीची शरणागती मोठी गोष्ट”; CM फडणवीसांनी केले पोलिसांचे अभिनंदन
6
“राहुल गांधींनी मतदारयादीतील घोळ देश पातळीवर मांडला, हे निकोप लोकशाहीला घातक”: थोरात
7
प्रॅक्टिस वेळी 'दादागिरी'; Live मॅचमध्ये आली तोंडावर पडण्याची वेळ! पृथ्वीसह चौघांच्या पदरी भोपळा
8
"पत्नीला म्हणाले, बसमध्ये बसलोय", तो कॉल ठरला शेवटचा, जितेशचा होरपळून गेला जीव; ओळखही पटेना
9
तालिबानकडे मिसाईल कुठून आली? हल्ला होताच गाफिल पाकिस्तान हादरला; ६५ वर्षांपूर्वी...
10
Pankaj Dhir: 'महाभारत'मधील 'कर्ण' काळाच्या पडद्याआड, अभिनेते पंकज धीर यांचं कर्करोगानं निधन
11
बाबासाहेब पाटलांनी पालकमंत्रिपद सोडलं, त्यांच्या जागी 'या' नेत्याला मिळाली जबाबदारी
12
दिवाळीपूर्वी 'या' दिग्गज कंपनीचा मोठा झटका! १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार? काय आहे कारण?
13
मोठी रिअल इस्टेट डील; अदानी खरेदी करणार सहाराच्या 88 मालमत्ता; किती कोटींचा व्यवहार?
14
Priyal Yadav : प्रेरणादायी! वडील तिसरी, आई सातवी पास; अकरावी नापास प्रियल कशी झाली डेप्युटी कलेक्टर?
15
'जंगलात जरी बोलवलं तरी गेलो असतो'; पोलिसांना दिलेले वचन CM फडणवीसांनी पूर्ण केले, कार्यक्रम रद्द करुन पोहोचले गडचिरोलीत
16
“...तोपर्यंत निवडणुका घेऊच नका, मतदारयादीची लपवाछपवी का?”; राज ठाकरेंची आयोगाला विचारणा
17
आधी बंपर लॉटरी लावली... आता एलजीच्या एमडींनी हिंदीत भाषण केलं; मन जिंकताच दिग्गज उद्योजकानंही केलं कौतुक
18
प्रशांत किशोर यांचा मोठा निर्णय; बिहार विधानसभा निवडणुकीतून घेतली माघार, कारण काय..?
19
अ‍ॅश्ले टेलिस यांना ट्रम्प भारतात राजदूत बनवणार होते, अचानक हेरगिरी प्रकरणी अटक; चीनशी कनेक्शनचा आरोप
20
एकनाथ शिंदेंचा काँग्रेससह शरद पवार गटाला मोठा धक्का, बडे नेते शिवसेनेत; पक्षाची ताकद वाढली

आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख कमलाकर यांची उचलबांगडी

By admin | Updated: June 10, 2016 05:08 IST

धनंजय कमलाकर यांच्या मुलाचे कोट्यवधी रुपयांचे कथित भूखंड प्रकरण समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची तडकाफडकी बदली केली

मुंबई : आर्थिक गुन्हे शाखेचे सहआयुक्त आणि ज्येष्ठ आयपीएस अधिकारी धनंजय कमलाकर यांच्या मुलाचे कोट्यवधी रुपयांचे कथित भूखंड प्रकरण समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची तडकाफडकी बदली केली आहे. कमलाकर यांना सागरी सुरक्षा विभागाचे महानिरिक्षक म्हणून पाठविण्यात आले आहे. आतापर्यंत या विभागात असलेले प्रवीण साळुंखे आर्थिक गुन्हे शाखेत कमलाकर यांच्या जागी आले आहेत. कमलाकर यांचा मुलगा रोहित यांने पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसीतील २०५ कोटी रुपयांच्या ७६ हजार चौरस मीटर भूखंडावर चार जणांच्या मदतीने अतिक्रमण केल्याची तक्रार एमआयडीसीने पोलिसांत केलेली होती. बनावट नोंदी दाखविल्याचेही तक्रारीत म्हटले होते. उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी देखील यास दुजोरा दिला. ते म्हणाले की, २० आॅक्टोबर १९९२ पासून ही जमीन एमआयडीसीच्या मालकीची आहे. या जमिनीच्या खरेदी-विक्रीची कोणतीही परवानगी एमआयडीसीने दिलेली नाही. खरेदी झाल्यानंतर महसूल विभागाकडे तक्रार करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल.(विशेष प्रतिनिधी)