शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
2
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
3
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
4
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
5
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
6
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
7
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
8
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
9
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
10
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
11
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
12
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
13
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
14
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
15
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
16
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
17
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
18
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
19
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
20
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी

‘लोक’मताचा कौल पर्यावरणपूरक मेट्रोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2017 02:30 IST

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या देशातील पहिल्यावहिल्या भुयारी मेट्रो-३ चे काम पहिल्यापासूनच वादात गुरफटले आहे.

-प्रचिता हरळय्या, अंकिता सणस, ऐश्वर्या गडकरीमुंबई: कुलाबा-वांद्रे-सीप्झ या देशातील पहिल्यावहिल्या भुयारी मेट्रो-३ चे काम पहिल्यापासूनच वादात गुरफटले आहे. गिरगाव, काळबादेवी येथील प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासह मेट्रोचे कारशेड नेमके कुठे? या प्रश्नांची सरबत्ती सातत्याने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनवर होत राहिली. मात्र त्यानंतरही निर्माण झालेले सर्व अडथळे पार करत मेट्रो-३ मार्गी लावायची; असा चंग बांधलेल्या कॉर्पोरेशनकडून प्रकल्पबाधितांचा प्रश्न निकाली काढण्यात येत आहे. आरे येथील मेट्रो कारशेडबाबत कॉर्पोरेशन ठाम आहे. मात्र दुसरीकडे मेट्रो-३ साठी झाडांची कत्तल होणार आहे. परिणामी झाडांच्या कत्तलीहून कॉर्पोरेशन टीकेचे धनी होत असतानाच मुंबईकरही याप्रश्नी बोलते झाले आहेत. या विषयांवर ‘लोकमत’ने मुंबईकरांशी संवाद साधला. ‘लोक’मताने ‘पर्यावरणपूरक मेट्रो’ला पसंती दिली आहे. दरम्यान, मेट्रो-३ या भुयारी प्रकल्पामुळे भविष्यात मुंबईतील वाहतूकीची समस्या काही प्रमाणात का होईना कमी होईल. मुंंबईकरांचा विशेषत: प्रवाशांचा वेळ वाचेल आणि साहजिकच वाहतूक प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून मेट्रो-३ कडे पाहिले जाईल. या कारणात्सव झाडांएवढीच मेट्रोही महत्त्वाची असल्याचे मुंबईकरांचे मत आहे.मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन ‘प्रकल्प परिसर’ या हरित उपक्रमांतर्गत कुलाबा-वांद्रे-सीप्झ मार्गावरील प्रस्तावित २७ स्थानकांच्या परिसरातील विविध गृहनिर्माण संस्था, शाळा आणि रुग्णालयांमध्ये २५ हजारांहून अधिक वृक्षांच्या रोपांचे वाटप करणार आहे.मेट्रो-३ च्या प्रस्तावित २७ स्थानकांवर एकूण ३ हजार ८९१ झाडे आहेत. त्यापैकी १ हजार ७४ झाडे कापण्यास तर १ हजार ७२७ झाडांचे पुनर्रोपण करण्यास मान्यता देण्यात आली आहे.प्रत्येक कापल्या जाणाऱ्या झाडामागे ३ झाडे लावणे बंधनकारक असते. त्याप्रमाणे तोडल्या जाणाऱ्या झाडांची भरपाई म्हणून कॉर्पोरेशन ३ हजार झाडे लावणार आहे.मेट्रो-३ या सार्वजनिक वाहतूक प्रकल्पामुळे दररोज जवळपास ६.५ लाख वाहनांच्या फेऱ्या कमी होणार आहेत. कार्बनडाय आॅक्साइडसारख्या विषारी वायूचे प्रमाण कमी होईल.मेट्रो-३ प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर जवळपास ६ हजार ८०० टन कार्बनडाय आॅक्साइड तसेच इतर हरितगृह वायूंचे प्रमाण कमी होणार आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर प्रकल्पाची सुरुवात होणार आहे.मेट्रो इतकी गरजेची नाही जितके पशू-पक्षी गरजेचे आहेत. जर मेट्रोसाठी झाडे तोडली गेली तर सर्व पक्ष्यांचे काय होणार याचा विचार केला आहे का? झाडांवर असलेली पक्ष्यांची घरटी, त्यांचे राहण्याचे ठिकाणच बदलून जाईल. माझ्या मते जर मेट्रो किंवा झाडे यातील एकाला निवडायचे असेल तर मी झाडाला निवडेन.- सौरभ पाटे, कांदिवलीमेट्रो आणि झाडे दोन्ही महत्त्वाचे आहे. पण मेट्रोसाठी झाडांचा बळी देणे हे चुकीचे आहे. झाडे निसर्गासाठी खूप महत्त्वाच्या स्थानी आहेत. मेट्रोऐवजी लोकलच्या संख्येत वाढ करायला हवी. जेणेकरून झाडे वाचतील. कारण मेट्रो सर्वांना परवडणारी नाही. सर्वसामान्यांची पहिली पसंत लोकलच आहे.- पूजा शिंदे, कांदिवलीमेट्रो आणि झाडे या दोन्ही गोष्टी आपापल्या ठिकाणी गरजेच्या आहेत. मेट्रो प्रकल्पासाठी झाडे तोडण्याऐवजी दुसरा उपाय शोधायला हवा. झाडांवर अनेक पक्ष्यांचा निवारा असतो. झाडे तोडल्यावर ते पक्षी कुठे जाणार? एक गोष्ट मिळवण्यासाठी झाडांची कतल करणे हे बरोबर नाही. यासाठीच पहिले प्राधान्य झाडांना दिले पाहिजे.- राहुल पाटील, वरळीमेट्रो प्रकल्प जितका महत्त्वाचा आहे तितकीच झाडेही महत्त्वाची आहेत. झाडे पर्यावरणासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात. पाऊस झाडांवर अवलंबून असतो. सध्या आपल्याला पावसाची जास्त गरज आहे. जर मेट्रो आणि झाडे यामधून एकाला निवडाचे असेल तर झाडांची निवड करेन.- विनिता प्रजापती, लोअर परळपर्यावरणात झाडे पहिल्या स्थानावर आहेत. मेट्रो उभारण्यासाठी झाडांचा बळी घेणे धोक्याचे ठरेल. अजून काही वर्षांनी आपल्यालासुद्धा परदेशातून पाणी मागवण्याची गरज भासणार आहे. यातच आपण अशा प्रकारे झाडे तोडली तर ते दिवस लवकरच येतील. - प्रियांका कांबळे, महालक्ष्मीमेट्रोची गरज आहे असे वाटत नाही. त्याऐवजी दुसरी सुविधा द्या. झाडे तोडून मेट्रो करणे उचित नाही. कारण झाडे पर्यावरणाला हातभार लावतात. परिणामी झाडांचा बळी देऊ नये. यावर दुसरा उपाय योजावा.- रोशन परब, बोरीवलीमेट्रो आणि झाडांमध्ये मी झाडांची निवड करेन. कारण आजघडीला वनसंपदा नष्ट होत आहे. याची पर्यावरणाला झळ बसत आहे.- मयूर गुगावले, कांदिवलीमेट्रो आणि झाडे आपआपल्या स्थानी आहेत. झाडे नसतील तर प्रदूषण वाढेल. म्हणून झाडे महत्त्वाची आहेत आणि मेट्रोही महत्त्वाची आहे. कारण लोकलमध्ये प्रचंड गर्दी असते. मेट्रो आली तर लोकलची गर्दी कमी होईल. मेट्रो प्रकल्पात झाडांना हानी पोहोचणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.- मिलिंद म्हात्रे, अंधेरीमाझे पहिले प्राधान्य झाडांना असेल कारण सध्या तरी मेट्रोची गरज नाही आहे. झाड तोडून मेट्रो सुरू करणे चूक आहे. झाडे गरजेची आहेत. झाडे तोडली तर माणसे जगणार कशी? परिणामी मेट्रोसाठी झाडे तोडू नका.- सीमा सणस, गँ्रट रोडशहराचा विकास करणे गरजेचे आहे. पण त्याचबरोबर निसर्ग महत्त्वाचा आहे. त्यामुळे सरकारने झाडांचा विचार करणे गरजेचे आहे.- विरेन कोंडे, गोरेगावमेट्रो आणि पर्यावरणापैकी मी पर्यावरणाला अधिक प्राधान्य देईन. मेट्रो आणि झाडांची बरोबरी करण्याची गरज नाही. दोन्ही आपआपल्या स्थानी महत्त्वाचे आहे. झाडे जगली तर पर्यावरण जगेल- सुरज सोनावणे, गोरेगावपर्यावरणामुळे माणसाला आॅक्सिजन मिळतो. विकासासाठी झाडांचा अथवा पर्यावरणाचा बळी देता कामा नये. मेट्रोपेक्षा झाडे महत्त्वाची आहे. - मनाली पाटील, अंधेरीडिजिटल इंडियासाठी मेट्रो महत्त्वाची आहे. जेणेकरून प्रवास सोपा होईल. पण झाडे तोडून इंडियाला डिजिटल करणे पूर्णपणे चुकीचे आहे. एक पाऊल प्रगतीकडे नेण्यासाठी आपण कोणाचा बळी नाही घेऊ शकत, मग ती झाडे असली तर काय झाले. पर्यावरणासाठी ते हानिकारक ठरेल.- किरण ठोकळे, वरळीमेट्रो आणि झाडे हे दोन्ही गरजेचे आहे. जेवढी झाडे मेट्रोसाठी तोडली जातील त्याच्या तिप्पट झाडे लावणे गरजेचे आहे.- आकाश ठाकरे, बोरीवलीआरे कॉलनीमध्ये मेट्रोची काहीच गरज नसून त्या ठिकाणी बसच्या सेवा वाढवल्या पाहिजेत. तसेच लोकसंख्या कमी असल्याने मेट्रो स्टेशन तयार करून काहीच फायदा होणार नाही. जास्त करून स्थानिक रहिवासी बसनेच प्रवास करतात. म्हणूनच आरेमध्ये मेट्रोचा फायदा होण्याची शक्यता कमीच वाटते. यासाठी झाडांचा बळी देणे चुकीचे ठरेल.- विशाल पांचाळ, गोरेगावकरी रोड येथे मोनोचे काम सुरू आहे. त्यामुळे तेथून गाडीने प्रवास करणे खूप त्रासदायक वाटते आणि आता झाडे तोडून मेट्रोचे काम चालणार असेल तर ते पूर्णपणे चुकीचे ठरेल. मुंबईत तशी फारशी झाडे पाहायला मिळत नाहीत आणि आता उरलेली झाडे तोडली जाणार असतील तर मेट्रो नकोच.- प्रणय हराळे, वरळीमेट्रो आणि झाडांमध्ये मी झाडांची निवड करेन. कारण झाडे आॅक्सिजन देतात आणि पर्यावरणाला हातभार लावतात. परिणामी झाडे तोडू नयेत तर ती आणखी लावली जावीत.- मधुमती गडकरी, मालाडआरे कॉलनी ही वृक्षसंपदेने नटलेली आहे. मुंबापुरीचा विचार करता येथे हे एकमेव क्षेत्र हिरवाईने नटलेले आहे. आरेतली वनसंपदेसाठी पर्यावरणवादी झटत आहेत.