शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
4
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
5
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
6
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
7
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
8
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
9
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
10
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
11
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
12
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
13
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
14
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
15
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
16
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
17
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
18
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
19
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
20
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!

इको-फ्रेंडली गणेशोत्सवासाठी विद्यार्थी सरसावले

By admin | Updated: September 18, 2015 11:17 IST

चिमुकल्यांनी घडविले गणराज : सिन्नर तालुक्यात विविध शाळांमध्ये शाडूमातीपासून गणेशमूर्ती घडविण्याची कार्यशाळा

सिन्नर : जलप्रदूषणाला आळा घालत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्लास्टर आॅफ पॅरिसच्या गणेशमूर्तींना फाटा देत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची मागणी सर्वच स्तरांतून जोर धरू लागली आहे. याचाच एक भाग म्हणून येथील एस.जी. पब्लिक स्कूल, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे सरदवाडी प्राथमिक विद्यामंदिरासह तालुक्यातील पाथरे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात शाडूमाती-पासून गणेशमूर्ती घडविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. एस.जी. पब्लिक स्कूलएस.जी. पब्लिक स्कूलच्या प्राथमिक विभागात घेण्यात आलेल्या शाडूमाती गणेशमूर्ती कार्यशाळेत २२५ विद्यार्थी सहभागी झाले होते.मुख्याध्यापक उदय कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यशाळेत माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे सचिव राजेश गडाख यांनी इको-फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. चार दिवस भिजत ठेवलेल्या शाडूमातीचे गोळे करून विद्यार्थ्यांना देण्यात आले. कलाशिक्षक गणेश तिडके, बापू चतुर, वृषाली जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी लाडक्या गणरायाच्या विविध सुबक मुद्रा साकारल्या. या प्रसंगी भास्कर गुरुळे, पांडुरंग लोहकरे, शिवाजी कांदळकर,  मनीषा जाधव, जयश्री सोनजे, विनायक काकुळते, सतीश बनसोडे, प्रमोद महाजन, सागर भालेराव, सुधाकर कोकाटे, पल्लवी अढांगळे, अमोल पवार, गणेश सुके, नीलेश मुळले, मंदा नागरे, जिजा ताडगे, संदीप गडाख आदिंसह विद्यार्थी उपस्थित होते.  पाथरे येथील पाथरे हायस्कूल व एस. जी. कनिष्ठ महाविद्यालयात घेण्यात आलेल्या शाडूमाती गणेशमूर्ती कार्यशाळेत पाचवी ते बारावीचे सुमारे २५० विद्यार्थी सहभागी झाले होते.प्राचार्य विद्या साळुंखे, पर्यवेक्षक नामदेव कानसकर, कलाशिक्षक प्रशांत दातरंगे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी सृजनशीलतेचे दर्शन घडवत मनमोहक गणेशमूर्ती तयार केल्या.या प्रसंगी संजय जाधव, कृष्णाजी घोटेकर, रंगनाथ चिने, उत्तम खैरनार, माधव शिंदे, रामचंद्र थोरात, संजय शेलार, किरण कुलकर्णी, सारिका उबाळे, छाया शेळके, बाबासाहेब डुंबरे, रमेश गडाख, नवनाथ कांबळे, नवनाथ पाटील, भारती खंबाईत, बाळासाहेब सिरसाट, रावसाहेब मोकळ आदिंसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. (वार्ताहर)