शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

अनधिकृत नळ जोडण्यांचे ग्रहण

By admin | Updated: April 30, 2016 02:47 IST

दक्षिण शहापाडा योजना बासनात गुंडाळल्यानंतर मौजे पाटणसई ते डोलवी अशा नागोठणे ते पेण दरम्यानच्या ४५ गावांना जेएसडब्ल्यू कंपनीकडून गेली २० वर्षे मोफत पाणी देण्यात येत आहे.

पेण : दक्षिण शहापाडा योजना बासनात गुंडाळल्यानंतर मौजे पाटणसई ते डोलवी अशा नागोठणे ते पेण दरम्यानच्या ४५ गावांना जेएसडब्ल्यू कंपनीकडून गेली २० वर्षे मोफत पाणी देण्यात येत आहे. मात्र पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेच्या असंख्य अनधिकृत नळ जोडण्या करण्यात आल्या आहेत. आणि व्यावसायिक वापरासाठी या पाण्याचा उपयोग होत असल्याने सामान्य नागरिकांना पाणीटंचाईस सामोरे जावे लागते. जोपर्यंत संबंधित बेकायदेशीर नळजोडण्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत पाणीगळतीचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेने अवैधरीत्या असलेल्या नळजोडण्यांवर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. पेणच्या दक्षिण भागाकडील ही ४५ गावे जेएसडब्ल्यू कंपनी प्रशासनाच्या मोफत पाणी योजनेचे उत्तरदायित्व म्हणून या पट्ट्यात येणाऱ्या ग्रामपंचायती व त्यांचे सरपंच मंडळीनी या अनधिकृत नळ जोडण्या केलेल्यावर कारवाई करणे आवश्यक आहे. थेंब थेंब जपून वापरा असे शासनाने महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीमुळे प्रत्येक ग्रामपंचायतीला आवाहन केले आहे. इथे मात्र कंपनी प्रशासनाला न जुमानता राजरोसपणे अनधिकृत नळ कनेक्शनधारकांची दंडेली वाढलेली आहे. या नळ जोडण्यांतून शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. मात्र त्यासाठी जेएसडब्ल्यू प्रशासनाला धरुन पाण्यासाठी बोंबाबोंब करण्यात येते. फुटलेल्या पाइप लाइनची दुरुस्ती वेळोवेळी कंपनी व्यवस्थापन करते. तरीही पुन्हा पुन्हा हीच परिस्थिती उद्भवते, या अनधिकृत नळ कनेक्शन जोडण्यांना प्रतिबंध घालण्यास ग्रामपंचायतीने अद्याप एकदाही पुढाकार घेतलेला नाही. सर्वांनी एकमताने निर्णय घेतल्यास समस्येचे निराकरण होऊ शकते. या पट्ट्यात वीटभट्टी, हॉटेल व्यावसायिक आदींना अनधिकृत नळकनेक्शनद्वारे पाणी उपसा प्रचंड होत आहे. संबंधित ग्रामपंचायतींनी याबाबत दक्षता घेऊन अनधिकृत नळ कनेक्शनधारकांवर ठोस प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. आरोग्य पथकाकडून तपासणीतक्र ारीनंतर कर्जत येथून पाणी तपासणी करणारे पथक कोल्हारे येथे पोहचले. त्यांनी पाणी उचलले जात असलेल्या उल्हास नदीवरील उद्भव ठिकाणाची पाहणी केली. त्यावेळी नदीमधून पाणी उचलले जात असताना कोणत्याही पाणी साठवण टाकी किंवा जलकुंभामध्ये भरले जात नसल्याचे समोर आले.नदीतील पाणी थेट नळ पाणी योजनेच्या पाइपमधून वितरीत केले जात आहे. त्यामुळे पाणी शुद्ध करून घेण्याचा कोणताही प्रयत्न कोल्हारे नळपाणी योजना पाहणारी यंत्रणा करीत नसल्याचे दिसून आले आहे.>कोल्हारेत नळपाणी योजनेच्या पाण्याचे परीक्षण नेरळ : कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायतीमधील कोल्हारे गावाच्या पाणी योजनेतून अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत असल्याचा मुद्दा ग्रामस्थ आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विजय हजारे यांनी उपस्थित केला आहे. नळपाणी योजनेतून येणारे पाण्याची तपासणी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. आरोग्य पथकाने पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले असल्याची माहिती हजारे यांनी दिली आहे.मात्र कर्जत येथून आलेल्या पाणी तपासणी पथकासमोर अनेक धक्कादायक प्रकार आले आहेत.भारत निर्माण योजनेतून तयार करण्यात आलेल्या नळपाणी योजनेमध्ये पाणी शुद्धीकरण यंत्रणा अंतर्भूत नाही. त्यामुळे पाण्याचा उद्भव असलेल्या उल्हास नदीच्या काठावर विहीर खोदून त्यात पंप टाकून पाणी उपसा करून ते पाणी वितरीत केले जाते. मात्र विहिरीत परिसरातील सांडपाणी झिरपत असल्याने कोल्हारे, बोपेले, आणि रामकृष्ण नगर भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व भागाला दूषित पाणीपुरवठा होत असल्याने या पाण्याचे तपासणी करण्याची मागणी हजारे यांनी केली आहे. कर्जत पंचायत समिती तसेच रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडे याबाबत तक्र ारही केली आहे. ग्रामस्थ आणि रहिवाशी यांना शुद्ध पाणी मिळावे या हेतूने कोल्हारे नळपाणी योजनेचे पाणी तपासणी करण्यासाठी नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाठविले आहे. आरोग्य केंद्राच्या पथकाने पाण्याचे नमुने घेऊन ते अलिबाग येथे तपासणी पाठविले आहेत. ज्याठिकाणाहून हे पाणी येते, त्याठिकाणी अनेकदा जनावरे डुंबत असतात.