शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
3
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?
4
क्रेडिट स्कोअरमध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर; पहिलं कोण? ४७ लाख लोकांत फक्त ५ लोकांचा सर्वात बेस्ट स्कोअर
5
भारतासोबत डबल गेम खेळतोय चीन? द्विपक्षीय संबंध सुधारत असतानाच केलं 'हे' मोठं काम
6
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
7
ग्लासमध्ये लघवी करून भांड्यांवर शिंपडायची, १० वर्षं जुन्या मोलकरणीचं घृणास्पद कृत्य सीसीटीव्हीत कैद!
8
खरंच TCS ३०,००० कर्मचाऱ्यांची कपात करणार का? युनियनचं आंदोलन, कंपनीनं दिलं स्पष्टीकरण
9
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
10
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
11
एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर; पायाला लागली गोळी
12
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
13
सांस्कृतिक केंद्राच्या दक्षिण विभागात २.२४ कोटींचा घोटाळा; सीबीआयने सुरू केली चौकशी
14
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
15
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
16
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
17
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
18
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
19
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
20
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !

इचमपल्लीसाठी राज्यपालांवर दबाव !

By admin | Updated: November 12, 2014 01:33 IST

महाराष्ट्राचे राज्यपाल चेन्नमेनेनी विद्यासागर राव यांच्या सत्कार कार्यक्रमात त्यांना इचमपल्ली धरणाच्या कामासाठी महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून सहकार्य करा, असे जाहीर आवाहनच करण्यात आले.

अभिनय खोपडे -गडचिरोली
तेलंगण सरकारने इचमपल्ली धरणाच्या निर्मितीसाठी आक्रमक पाऊल उचलले असून, रविवारी हैदराबाद येथे आयोजित महाराष्ट्राचे राज्यपाल चेन्नमेनेनी विद्यासागर राव यांच्या सत्कार कार्यक्रमात त्यांना इचमपल्ली धरणाच्या कामासाठी महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून सहकार्य करा, असे जाहीर आवाहनच करण्यात आले. तसेच महाराष्ट्राच्या राज्यपालांवर तेलंगण सरकारने या कामासाठी मोठा दबाव वाढविला असल्याची विश्वसनीय माहिती आहे. 
महाराष्ट्र-तेलंगण सीमेलगत 198क् च्या दशकात इचमपल्ली धरणाचे काम करण्याचा प्रय} करण्यात आला. मात्र, त्या वेळी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी या प्रकल्पाला विरोध केला होता़ या धरणात सिरोंचा तालुक्यातील दीडशे गावे बुडीत क्षेत्रत जाणार आहेत. तत्कालीन वनमंत्री छेदीलाल गुप्ता यांनी सदर धरण झाल्यास आपण पहिले आंदोलन करू, असाही इशारा आंध्र प्रदेश सरकारला दिला होता. 
महाराष्ट्राचा हा विरोध लक्षात घेऊन या धरणाचे काम 3क् वर्षापासून प्रलंबित आहे. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी हस्तक्षेप करून हे काम थांबविले होते. इचमपल्ली धरणामुळे तेलंगणच्या 1क् जिल्ह्यांतील जवळपास दीड लाख एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. तसेच छत्तीसगडमध्ये वीजनिर्मिती प्रकल्पालाही पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तेलंगण या धरणाचे काम मार्गी लावण्यासाठी प्रय} करताना दिसत आहे. तेलंगण सरकारतर्फे हैदराबाद येथे महाराष्ट्राचे राज्यपाल चेन्नमेनेनी विद्यासागर राव यांचा 9 नोव्हेंबर रोजी जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. या वेळी तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी राव यांना इचमपल्ली धरणाचा प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी सहकार्य करण्याचे जाहीर आवाहन केले. 
राज्यपाल राव हे तेलंगणच्या करीमनगर भागातील रहिवासी आहेत. ते भाजपाचे माजी खासदारही होते. ते इचमपल्ली धरणाचे समर्थक असल्याचे मानले जाते. त्यामुळे त्यांनी सत्कारादरम्यान धरणाच्या कामासाठी सर्व सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिल्याची विश्वसनीय माहिती आहे. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात रविवारी बंडारू दत्तात्रेय यांचीही वर्णी लागली आहे. तेही या इचमपल्ली धरणाचे कट्टर समर्थक आहेत. याशिवाय तेलंगण भाजपाचे प्रदेशाध्यक्ष क्रिष्णा रेड्डी यांनी 2क्क्3-क्4 मध्ये सदर धरणाचे काम मार्गी लागावे म्हणून आंदोलन केले होते. त्या वेळी ते भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. 
तेलंगणमधील भाजपाची भूमिका ही इचमपल्ली धरणाच्या समर्थनाची आहे. त्यामुळे दबाव वाढविण्याचा प्रयत्न केला जात आह़े दुसरीकडे महाराष्ट्र सरकारने सद्य:स्थितीत सुरू असलेल्या चव्हेला धरणाच्या कामालाही विरोध केलेला नाही. आता पुन्हा एका धरणाचे नवे संकट महाराष्ट्रावर येऊ घातले आहे.
 
च्198क् मध्ये मी आमदार होतो. त्या वेळी या धरणाचा प्रश्न निर्माण झाला होता. या धरणामुळे सिरोंचा तालुक्याला मोठा फटका बसणार आहे. जवळपास दीडशे गावे बुडीत क्षेत्रत जातील. वनजमीनही बुडणार आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल तेलंगण भागातील असले तरी राज्याचे हित लक्षात घेऊनच ते याबाबत भूमिका घेतील, असा आम्हाला विश्वास आहे. गडचिरोली या मागास जिल्ह्यावर कोणताही अन्याय होता कामा नये, अशी आमची कायम भूमिका आहे, असे चंद्रपूर-गडचिरोली क्षेत्रचे माजी खासदार नरेश पुगलिया यांनी सांगितले.