शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

इबोलावर ‘अबोला’ का ?

By admin | Updated: September 15, 2014 01:05 IST

इबोला रोगाने भारतात धुडगूस घालता कामा नये, यासाठी नागपूर विमानतळावरही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उपाययोजना उभारण्याचे आदेश पाच दिवसांपूर्वी मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिलेत. परंतु येथील शासकीय

शासकीय रुग्णालयांचे मौन : औषधे, स्वतंत्र कक्षाचा अभावसुमेध वाघमारे - नागपूर इबोला रोगाने भारतात धुडगूस घालता कामा नये, यासाठी नागपूर विमानतळावरही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उपाययोजना उभारण्याचे आदेश पाच दिवसांपूर्वी मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिलेत. परंतु येथील शासकीय रुग्णालयांच्या डॉक्टरांना ‘इबोला’च्या संदर्भात प्रशिक्षण नाही, आवश्यक औषधे उपलब्ध नाही आणि विशेष म्हणजे स्वतंत्र कक्ष नाही. परिणामी, संशयित रुग्ण जरी आढळून आला तरी मोठा धोका होण्याची शक्यता आहे. जगभरात झपाट्याने पसरणाऱ्या इबोला आजाराचा राज्यात प्रवेश रोखण्यासाठी नागपूर विमानतळावर इबोला तपासणी सुविधा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. विमानतळावर मिहान इंडिया लिमिटेड या कंपनीमार्फत स्क्र ीनिंग सुविधा देण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला त्याबाबत सूचना देण्यात आल्याचे विमानतळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, आरोग्य विभागाकडून आलेल्या परिपत्रकानंतर मेडिकलशी संपर्क साधण्यात आला होता. रुग्णालयाने आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या इबोला तपासणीबाबत मार्गदर्शन करावे, असे सूचित करण्यात आले होते. उपसंचालक आरोग्य विभागाने या संदर्भात शनिवारी बैठकही आयोजित केली होती, परंतु मेडिकलकडून कुणीच उपस्थित नव्हते. यामुळे उपाययोजनेच्या संदर्भात मेडिकल अद्यापही अंधारातच आहे. मेडिकलमध्ये आधीच संसर्गजन्य वॉर्डाला ग्रहण लागले आहे. या वॉर्डाला शासकीय मंजुरी मिळून तीन वर्षे झालीत. परंतु बांधकाम अद्यापही थंडबस्त्यात आहे. यामुळे स्वाईन फ्लूचे रुग्ण वैद्यक औषधशास्त्र विभागाच्या वॉर्ड क्रमांक २५ मध्ये ठेवले जातात. या रुग्णांची संख्या कमी असल्याने येथे इतरही रुग्ण भरती असतात. सध्याच्या स्थितीत मेडिकलचा अपघात विभाग ते अतिदक्षता विभाग फुल्ल आहे. यात ‘इबोला’चा संशयित रुग्ण जरी मिळाला तरी त्याला ठेवण्याची सोय मेडिकलमध्ये नाही. यापेक्षा बिकट स्थिती मेयो रुग्णालयाची आहे. सध्या मेडिकलच प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर आहे. यामुळे कोणतीच गोष्ट गांभीर्याने घेतली जात नसल्याचे चित्र आहे.