शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

मशिनमध्ये कचरा टाकून चॉकलेट खा!

By admin | Updated: June 29, 2016 01:31 IST

केंद्र शासनातर्फे राबविण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियानातील एका नवख्या उपक्रमाचा पथदर्शी प्रकल्प येथून राबविण्यात सुरुवात करण्यात आली

लोणावळा : स्वच्छतेचा थेट संबंध आरोग्याशी असल्याने सामाजिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी केंद्र शासनातर्फे राबविण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियानातील एका नवख्या उपक्रमाचा पथदर्शी प्रकल्प येथून राबविण्यात सुरुवात करण्यात आली आहे. टेकबिन (टेक्नॉलॉजिकल अ‍ॅडव्हॉन्स बिन) नावाचे एक मशिन शहरात जागोजागी लावण्यात आले आहे. या मशिनची खासियत म्हणजे यामध्ये कचरा टाकला, की त्या बदल्यात कचरा टाकणाऱ्याला चॉकलेट मिळते. नागरिकांना कचरा कुंडीतच टाकण्याची सवय लावण्यासाठी हा अतिशय प्रभावी उपक्रम ठरेल, असे या मशिनची निर्मिती करणाऱ्या कंपनीचे म्हणणे आहे. लोहगड दर्शन उद्यान, भांगरवाडी येथे बसविण्यात आलेल्या या टेकबिन मशिनचे उद्घाटन नुकतेच ज्येष्ठ नगरसेवक श्रीधर पुजारी व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गवळी यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन समारंभासाठी कंपनीचे संस्थापक अभिजित देवकर, गणेश जाधव, अभियंता विनोद बच्छाव, सुशांत कुमठेकर, माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, नगरसेविका जयश्री काळे, शकुंतला इंगुळकर, प्रकाश काळे, अन्वर निंबर्गी उपस्थित होते. (वार्ताहर)>तत्कालीन मुख्याधिकारी गणेश शेटे व नगराध्यक्ष अमित गवळी यांनी मागील वर्ष-दीड वर्षापासून लोणावळा शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा विडा हाती घेतला. त्यादृष्टीने विविध उपक्रम राबवीत मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणला. त्यांच्याच प्रयत्नांतून मुंबईस्थित एशियन गॅलट या टेकबिन मशिनची निर्मिती करणाऱ्या कंपनीने पथदर्शी प्रकल्प म्हणून या मशिन लावण्याची सुरुवात लोणावळ्यापासून केली आहे.