शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; लेखक, कवी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार परत करणार
2
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
3
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
4
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
5
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
6
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
7
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
8
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
9
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
10
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
11
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
12
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
13
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
14
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
15
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
16
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
17
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
18
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
19
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
20
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 

ईस्टर्न एक्स्प्रेस-वे खोळंबला

By admin | Updated: October 2, 2015 04:13 IST

विक्रोळी गांधीनगर पुलावर मिक्सर टे्रलर उलटून अपघात झाला. या अपघातामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावर तब्बल आठ तास वाहतुकीचा खोळंबा झाला.

मुंबई : विक्रोळी गांधीनगर पुलावर मिक्सर टे्रलर उलटून अपघात झाला. या अपघातामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावर तब्बल आठ तास वाहतुकीचा खोळंबा झाला. त्यामुळे ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या अपघातात दोन जण जखमी झाले. जखमींवर जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी टे्रलरचालक शंकू कुमार प्रसाद (३५) याला अटक करण्यात आली आहे. गांधीनगर पुलावर चढत असताना चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्याने तो रस्त्याच्या दुसऱ्या मार्गिकेवर जाऊन आदळला आणि हा अपघात झाला. या अपघातात वंदना किरत (३५) आणि परशुराम पाटील (५२) हे दोघे गंभीर जखमी झाले. घटनास्थळी दाखल झालेल्या पार्कसाईट पोलिसांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. या अपघातामुळे तब्बल आठ तास येथील वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे कामावर निघालेल्यांना याचा फटका बसला. मुलुंडपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक पोलिसांकडून तात्पुरत्या स्वरूपात मार्ग उपलब्ध करून देण्याचे काम सुरू होते. दुपारी ३च्या सुमारास येथील टे्रलर हटवून मार्गिका मोकळी करण्यात आल्याने प्रवाशांसह चालकाने सुटकेचा नि:श्वास सोडला. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती विक्रोळी पार्कसाईट पोलिसांनी दिली. टँकर उलटल्यामुळे पूर्व द्रुतगती मार्ग जणू ठप्प झाला. पुढेही जाता येत नाही आणि वाहन मागवून मागेही जायची सोय नाही, अशा परिस्थितीत प्रवासी अडकले.गांधीनगर पुलावर चढत असताना चालक प्रसाद याचा गाडीवरचा ताबा सुटल्याने तो रस्त्याच्या दुसऱ्या मार्गिकेवर जाऊन आदळला. सकाळी ७च्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात इको कारसह, रिक्षा, दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.