शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भूकंप सांगून होत नसतात!

By admin | Updated: March 23, 2017 23:54 IST

माझ्या पक्षांतराबद्दल बातम्या येत आहेत. पण मी कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही, असे सांगत या बातम्या पेरण्यांमागे

मुंबई : माझ्या पक्षांतराबद्दल बातम्या येत आहेत. पण मी कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही, असे सांगत या बातम्या पेरण्यांमागे काँग्रेसमधील नेत्यांचा हात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला. शिवाय, राजकीय भूकंप सांगून होत नसतात, असे सूचक वक्तव्यही केले.राणे म्हणाले, मतदारसंघातील कामांसाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटलो. त्यावरून लगेच मी भाजपात जाणार अशा वावड्या उठविण्यात आल्या. मी कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही आणि कोणताही नेता मला भेटलेला नसताना गेले १५ दिवस माझ्या पक्षांतराची चर्चा सुरू आहे. मी कोणालाही न भेटता अशा बातम्या खात्री न करता पसरवणे चुकीचे आहे, असेही राणे म्हणाले. मात्र, त्याचवेळी अशा बातम्यांमागे पक्षातील काही नेत्यांचा हात असल्याचा आरोपही त्यांनी केला. पण कोणाचेही नाव घेतले नाही.आ. नीलेश राणे यांनी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीसपद का सोडले, असे विचारले असता प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण निर्णय घेण्यास दिरंगाई करत आहेत, असे उत्तर राणे यांनी दिले. तर वृत्तवाहिनीशी बोलताना राणे यांनी पक्ष नेतृत्वावर विश्वास असल्याचे सांगतानाच पक्षाने आपल्या क्षमतेचा पुरेपूर वापर करून घेतला नाही, अशी खंतही बोलून दाखवली. शिवाय, राज्यातील काही नेते स्वत:च्या स्वार्थापलीकडे पक्षाचा विचार करत नाहीत, अशी तोफही डागली. (विशेष प्रतिनिधी)