शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

भूकंपग्रस्तांसाठी बुलेटवरून सातारा ते काठमांडू!

By admin | Updated: August 20, 2015 09:21 IST

भटकंती एका दानशूराची : ‘सेफ नेपाळ-सेव्ह नेपाळ’साठी प्रयत्न

प्रदीप यादव- सातारा शक्तिशाली भूकंपाच्या धक्क्यांनी नेपाळमध्ये मोठी हानी झाली. बसंतपूर येथील दरबार स्क्वेअर हे पर्यटकांचे आकर्षणस्थळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. पर्यटन हेच उत्पन्नाचे साधन असलेल्या नेपाळवासीयांनी दिलेल्या ‘सेफ नेपाळ-सेव्ह नेपाळ’ हाकेला साद देत सातारच्या एका दानशूर युवकाने सातारा ते काठमांडू असा बुलेटवरून प्रवास करीत आर्थिक मदत केलीच. शिवाय पर्यटकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी जागृतीफेरीही काढली. साताऱ्यातील कृष्णानगर येथील तुषार जोगळेकर हा ३४ वर्षीय युवक गेली चार वर्षे नेपाळमध्ये पर्यटनासाठी जात होता. तेथील निसर्गाने आणि स्थापत्यकलेने त्याला जणू भुरळच घातलेली. काही महिन्यांपूर्वी नेपाळमधील अनेक शहरे भूकंपाच्या धक्क्यांनी उद्ध्वस्त झाली. जगभरातून नेपाळवासीयांना मदतीचा हात देण्यात आला. मात्र, ज्या देशाने आपल्या अतीव सौंदर्याने पर्यटकांची मने रिझविली, त्याच्या उभारणीसाठी आपणही काही देणे लागतो, या बांधिलकीतून तुषारने आयुष्यात प्रथमच बुलेटवरून ‘सातारा ते नेपाळ’ असा थरारक प्रवास करत नेपाळवासीयांच्या मदतीला धावून गेला. विशेष म्हणजे, सातारा ते नेपाळ हा २ हजार ४०० किलोमीटरचा प्रवास त्याने पाच दिवसांत पूर्ण केला. सोबत होत्या फक्त गरजेपुरत्याच वस्तू.‘सेफ नेपाळ-सेव्ह नेपाळ’ याविषयी विचारले असता तुषारने सांगितले की, नेपाळवासीयांसाठी पर्यटन हेच एकमेव उत्पन्नाचे साधन आहे. भूकंपामुळे तिथे मोठी हानी झाली आहे. पर्यटकांचे आकर्षण असलेली अनेक ठिकाणं कोसळली आहेत. जगभरातून मदतीचा हात आला आहे; परंतु पुन्हा उभारी घेण्यास काही काळ लागेल. भूकंपामुळे तेथील पर्यटनावर मोठा परिणाम झाला आहे. पर्यटकांच्या मनात भीतीने घर केले आहे. त्यामुळे लोक बेरोजगार झाले आहे. जगाच्या नकाशावरील स्वच्छ अन् सुंदर नेपाळ पुन्हा उभे राहावे, यासाठी ‘सेफ नेपाळ-सेव्ह नेपाळ’ची हाक नेपाळवासीयांनी दिली आहे. त्यांच्या या हाकेला धावून जात मीही त्यांच्यात सहभागी होऊन आता नेपाळ सुरक्षित आहे. घाबण्याचे कारण नाही. तुम्ही पर्यटनाला या.. असा संदेश रॅलीच्या माध्यमातून दिला. घरे उद्ध्वस्त; तंबूत संसारविध्वंसक भूकंपात मोठमोठ्या इमारतींसह घरेही जमीनदोस्त झाली आहेत. जगभरातून आलेल्या मदतीत अनेक देशांनी चांगल्या प्रतीचे कापडी तंबू दिले आहेत. त्यामध्ये लोकांनी आपला संसार थाटला आहे. आपला देश पुन्हा नव्याने उभारू, या जिद्दीने लोक झटत आहेत. घरे कोसळली असली तरी माणसं कोसळली नाहीत, हे त्यांच्या इच्छाशक्तीवरून पाहायला मिळाले.साताऱ्यात जल्लोषी स्वागततुषारचा मित्रपरिवार मोठा आहे. आपल्या स्वभावामुळे जिथे जाईल तिथे त्याने मित्र जोडले आहेत. अगदी नेपाळमध्येही त्याचे तीसेक मित्र आहेत. हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व आणि मनस्वी जीवन जगणाऱ्या तुषारने ‘सातारा ते नेपाळ’ हा बुलेट प्रवास करण्याचे ठरविले तेव्हा मित्रांनी त्याला प्रोत्साहन दिले. तो जेव्हा परत आला तेव्हा साताऱ्यातील नाका ग्रुपने केक कापून तुषारचे जल्लोषी स्वागत केले.रोमांचकारी प्रवासनेपाळहून परतत असताना मार्ग बदलला. या मार्गावरील प्रवास जेवढा आनंददायी तेवढाचा थरारक होता. कधी नदीतून, कधी दगड धोंड्यांतून तर कधी चकाचक रस्त्यावरून प्रवास करताना ठिकठिकाणी धोक्याची सूचना असलेले फलक पाहायला मिळत होते. लेह-मनाली रस्त्याने प्रवास करताना कधी वाळवंट तर कधी बर्फाच्छादित प्रदेश अशा वातावरणातील प्रवास कठीण होता. मिल्ट्रीच्या छावण्या, बंदूकधारी भारतीय जवान, कारगिल रणभूमी, पाहून ऊर भरून येत होता. एका बाजूला चीन तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानच्या सीमा डोळ्यांसमोर दिसत होत्या. ‘सावधान... दुश्मन आपको देख रहा हैं, असे सूचना फलक रस्त्यावर पाहायला मिळत होते. नेपाळवासीयांना स्वच्छतेची शिस्तगेल्या चार वर्षांपासून नेपाळची सहल करीत आहे. त्याठिकाणी अनेक मित्र झाले आहेत. तेथे जाणवलेली एक गोष्ट म्हणजे नेपाळमध्ये चोरी कधी होत नाही आणि लोकांना स्वच्छतेची प्रचंड आवड आहे. आपले घर, परिसर स्वच्छ असावा, या भावनेतून ते स्वत:हून कचरा साफ करत असतात.नेपाळची राजधानी काठमांडू येथे वीस दिवस राहिलो. लोकांच्या मिसळून पर्यटकांमध्ये असलेली भीती दूर व्हावी, यासाठी रॅली काढून जागृती केली अन् पन्नास हजार रुपयांची मदतही केली. नैसर्गिक संकटाचा फटका बसलेल्या एका देशाला सावरण्यासाठी मीही काही करू शकलो, यात मोठे समाधान मिळाले.- तुषार जोगळेकर, सातारा