शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
6
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
7
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
8
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
9
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
10
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
11
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
12
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
13
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
14
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
15
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
16
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
17
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
18
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
19
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
20
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट

आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन आॅक्टोबरपूर्वी

By admin | Updated: April 19, 2015 00:41 IST

मुंबईतील इंदू मिलच्या जागेवर होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन आॅक्टोबरमध्ये म्हणजे धम्मचक्र प्रवर्तनदिनापूर्वी करण्याचा सरकारचा मानस आहे,

नागपूर : मुंबईतील इंदू मिलच्या जागेवर होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन आॅक्टोबरमध्ये म्हणजे धम्मचक्र प्रवर्तनदिनापूर्वी करण्याचा सरकारचा मानस आहे, अशी माहिती सामाजिक न्यायखात्याचे मंत्री राजकुमार बडोले यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५ वे जयंती वर्ष सामाजिक समता वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्यानिमित्त राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती बडोले यांनी दिली. मुंबईच्या इंदू मिलच्या जागेवर होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या भूमिपूजनाकडे त्यांचे लक्ष वेधले असता बडोले म्हणाले की, केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यावर या प्रक्रियेला गती आली आहे. जागा हस्तांतरित करण्यात आली आहे. आॅक्टोबरपर्यंत म्हणजे धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या वर्धापनदिनापूर्वी भूमिपूजन करण्याचा सरकारचा मानस आहे. काँग्रेसने इंदू मिलमध्ये केलेल्या प्रतिकात्मक भूमिपूजनासंदर्भात बडोले म्हणाले की, काँग्रेसकडून हा श्रेय लाटण्याचा प्रकार आहे. स्मारक व्हावे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील आहेत. (प्रतिनिधी)सामाजिक समता वर्षसामाजिक समता वर्षाच्या निमित्ताने विविध योजना राबविण्यात येणार आहे. शिष्यवृत्ती वाटपातही पारदर्शकता आणण्यात येईल. ज्या अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती मिळत नाही त्यापैकी काहींचा विचार शिष्यवृत्तीसाठी केला जाईल. संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेचे अनुदान वाटप बायोमेट्रिक पद्धतीने केले जाईल आणि जात वैधता प्रमाणपत्राचे कक्ष प्रत्येक जिल्ह्णात या महिन्यात सुरू होईल, असे बडोले म्हणाले.लंडनमध्येहोणार स्मारकराजकुमार बडोले म्हणाले की, लंडन येथे संग्रहालय आणि वाचनालय सुरू करण्याचा विचार आहे. त्याचप्रमाणे लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर चेअर स्थापन करणे, त्याचप्रमाणे आंबेडकर यांच्या नावाने फेलोशिप सुरू करण्यात येणार असून, लंडनमध्ये राहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा सरकारचा मानस असल्याचे ते म्हणाले़