शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

खरेदीसाठी ई-निविदा बंधनकारक

By admin | Updated: November 18, 2015 03:16 IST

चिक्की व अन्य वस्तू खरेदी करण्यासाठी वेगवेगळ्या कंत्राटदारांना २०६ कोटी रुपयांचे कंत्राट ई-निविदा न काढताच देण्यात आल्याने राज्य सरकारला सर्व बाजूंनी टीकेची झोड सहन

मुंबई : चिक्की व अन्य वस्तू खरेदी करण्यासाठी वेगवेगळ्या कंत्राटदारांना २०६ कोटी रुपयांचे कंत्राट ई-निविदा न काढताच देण्यात आल्याने राज्य सरकारला सर्व बाजूंनी टीकेची झोड सहन करावी लागली. त्यामुळे जाग्या झालेल्या सरकारने आता नवीन धोरण आखत प्रत्येक वस्तू खरेदी करण्यापूर्वी ई-निविदा काढणे बंधनकारक केले आहे. या नव्या धोरणात वस्तू खरेदी करण्यापूर्वी कोणत्या प्रक्रिया पार पाडणे आवश्यक आहे, हे नमूद करण्यात आल्याची माहिती मंगळवारी राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिली. ‘शासकीय विभागासाठी कार्यालयीन खरेदीसाठी कार्यपद्धतीच्या नियमावली’संदर्भात राज्य सरकारने ३० आॅक्टोबर रोजी अधिसूचना काढली आहे. या धोरणांतर्गत पाच श्रेणी करण्यात आल्या आहेत. मात्र प्रत्येक श्रेणीसाठी ई-निविदा काढणे बंधनकारक करण्यात आले आहे, अशी माहिती महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाला दिली. प्रत्येक वस्तू खरेदी करण्यापूर्वी नव्या धोरणात नमूद करण्यात आलेल्या सर्व प्रक्रिया पार पाडणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच भ्रष्टाचाराला आळा बसावा म्हणून आर्थिक बंधने घालण्यात आली आहेत, असेही अ‍ॅड. अणे यांनी खंडपीठाला सांगितले. ‘५ हजार रुपयांपर्यंत दर असलेल्या वस्तू एका वर्षात कमाल ५० हजार रुपयांपर्यंतच घेता येतील; तसेच वस्तूंचे दर ३ लाख ते १ कोटी रुपयांपर्यंत जात असतील, तर दरपत्रक मागवणे बंधनकारक असेल. तसेच खरेदीचे आदेश देण्यापूर्वी राज्य सरकारकडून परवानगी घ्यावीच लागेल. त्याशिवाय वस्तू खरेदी करण्याचा प्रस्ताव दरवर्षी १५ फेब्रुवारीपर्यंत राज्य सरकारकडे सादर करावा लागेल आणि त्या प्रस्तावावर राज्य सरकार १५ मार्चपर्यंत निर्णय घेईल, असेही नव्या धोरणात नमूद करण्यात आले आहे,’ असे अ‍ॅड. अणे यांनी खंडपीठाला सांगितले. पंकजा मुंडेंच्या महिला व बाल विकास विभागाने ई-निविदा न मागवताच २०६ कोटी रुपयांच्या वस्तू मागवल्या. तसेच सरकारी शाळांसाठी मागवलेली चिक्की निकृष्ट दर्जाची होती. त्यामुळे या सर्व प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका संदीप अहिरे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीत सरकारने नव्या धोरणाची माहिती दिली. चिक्कीप्रकरणी चौकशी केली का? अशी विचारणा मंगळवारी खंडपीठाने केली. सरकारने चौकशी केली नसून अन्न व औषधे प्रशासनाने चिक्कीचे नमुने गोळा केले आणि तपासणी केली. मात्र चिक्की निकृष्ट दर्जाची नसल्याचे प्रशासनाने अहवालात म्हटले आहे. खंडपीठाने या याचिकेवरील सुनावणी १० डिसेंबर रोजी ठेवली आहे.