शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या बसेसवर ई-टॅग प्रणाली बसविणार

By admin | Updated: January 24, 2017 04:28 IST

टोल नाक्यांवर टोल भरण्यासाठी एसटी बसेसना लागणारा वेळ, त्यामुळे प्रवाशांनाही इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी लागणारा ले

मुंबई : टोल नाक्यांवर टोल भरण्यासाठी एसटी बसेसना लागणारा वेळ, त्यामुळे प्रवाशांनाही इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी लागणारा लेटमार्क आणि टोलचा आर्थिक ताळेबंद ठेवताना होत असलेला गोंधळ, या सर्वातून एसटी महामंडळाची लवकरच सुटका होईल. एसटीच्या बसेसवर ई-टॅग प्रणाली बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या प्रणालीद्वारे टोलची रक्कम थेट बँकेतूनच अदा केली जाईल. महत्त्वाची बाब म्हणजे, यामुळे १0 टक्के सूट टोलमधून एसटी बसेसना मिळेल. एसटीचा राज्यात मोठा पसारा आहे. जिल्हा मार्ग, राज्य मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गांवरून एसटी बसेस जाताना, त्यांना या मार्गावरील टोल नाक्यांवर टोल भरावा लागतो. यात सध्या राष्ट्रीय महामार्गांव्यतिरिक्त अन्य टोल नाक्यांतून एसटीच्या बसेसना सूट देण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्र्गावरील जवळपास ४३ टोल नाक्यांतून एसटीच्या ३,५00 हून अधिक बसेस जातात. तर काही महापालिका क्षेत्रातील टोल नाक्यांमधून एसटी जात असून, वर्षाकाठी १३५ कोटी रुपये टोल महामंडळ भरत आहे. मुळात टोल भरताना एसटी बसेसचा वेळ जातो. त्यामुळे प्रवाशांनाही त्याचा मनस्ताप होतो. वाहक टोलची पावती गहाळ झाल्यास वाहकावरच ‘बिल’फाडले जाते. त्याचप्रमाणे, टोलचा ताळेबंद ठेवतानाही एसटीच्या नाकेनऊ येतात. या सर्व कटकटीतून बाहेर पडण्यासाठी एसटी बसेसवर ‘ई-टॅग’बसवण्याचा निर्णय घेतला. (प्रतिनिधी)