शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
2
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
3
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
4
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
5
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
6
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
7
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
8
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
9
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
10
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
11
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
12
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
13
५ राजयोगात मार्गशीर्ष अमावास्या २०२५: ९ राशींवर लक्ष्मी कुबेर कृपा, कल्पनेपलीकडे यश-पैसा-लाभ!
14
Creta ला टक्कर देण्यासाठी येतेय Mahindra ची नवी 'मिड-साईज' SUV; असे असेल डिझाईन अन् खासियत
15
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: वर्षातली शेवटची आणि प्रभावशाली रात्र; आठवणीने करा 'हे' ५ उपाय!
16
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
17
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
19
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
20
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीच्या भेटवस्तूंमध्ये ई-गॅझेट अग्रस्थानी

By admin | Updated: October 21, 2016 17:57 IST

बदलत्या परिस्थितीनुसार मनुष्याच्या जीवनशैलीत होणाऱ्या बदलांनुसार दैनंदिन जीवनातील चालीरीती, परंपरा, सण-उत्सवातील बाजारपेठ आणि उद्योग व्यवसायातही

ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. २१ : बदलत्या परिस्थितीनुसार मनुष्याच्या जीवनशैलीत होणाऱ्या बदलांनुसार दैनंदिन जीवनातील चालीरीती, परंपरा, सण-उत्सवातील बाजारपेठ आणि उद्योग व्यवसायातही स्पष्टपणे बदल झाल्याचे दिसून येत आहे. पूर्वी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आप्तेष्ट व्यक्तींना मौल्यवान वस्तू भेट देण्याच्या प्रथेतही बदल दिसून येत असून, आता अशा मौलिक वस्तूंची जागा विविध प्रकारच्या ई-गॅझेटने घेतली आहे.

उद्योग व्यवसायातील बिलयंत्रणा आणि ताळेबंद संगणकीकृत होत असल्याने दिवाळीच्या मुहूर्तावर व्यवसायात नवीन संघणकीकृत यंत्रणा सुरू करणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात विविध प्रकारच्या ई-गॅझेटला मागणी वाढली आहे. आधुनिक तंत्रानावर आधारीत उद्योग व्यवसायांमध्ये आणि वैयक्तीक नातेसंबधांमध्येही असाबदल झाला आहे. दिवाळीत भाऊबीजेच्या दिवशी प्रत्येक भाऊ आपल्या लाडक्या बहिणीला विशेष वस्तू भेट देतो. या विशेष भेटवस्तूंमध्ये स्मार्टफोन, नोट, टॅबलेट अशा ई-गॅझेटचा अग्रक्रम असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे.

उद्योग व्यवसायात पारंपरिक पद्धतीने ताळेबंद तसेच उधारीचे खाते नोंदवहीत लिहिण्याची पारंपरिक पद्धत रूढ असताना वेगवेगळ्या उद्योगधंद्यातील व्यावसायिक आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरीत ही यंत्रणा संगणकीकृत करण्याला प्राधान्य देत आहेत. अशा यंत्रणांमुळे व्यवहाराचे बिल तयार झाले की त्याची रोजनिशीत आणि ताळेबंदात स्वंयचलितरीत्या नोंद होण्याची तरतूद संगणक यंत्रणांमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे वेळ आणि श्रमाची बचत होतानाच व्यवहारातील सुटसुटीतपणा आणि नोंदी जतन करण्यास सोपे होते. शिवाय टचपॅड यंत्रणेमुळे सर्व पर्याय डोळ्यासमोर असल्याने केवळ स्पर्शाने बिल करणे शक्य होत असल्याने नवीन तंत्रज्ञानयुक्त विविध ई-गॅझेटचा वापर सोपा झाला आहे. ई-गॅझेटचा बोलबालाजगातील विविध देशांनी मंदीची लाट अनुभवली असून, व्यापार-उद्योगाबरोबरच बँका, आर्थिक संस्थांची दिवाळखोरी आणि अर्थव्यवस्था कोलमडल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. पपरंतु भारत देशाची रचना आणि येथील सण, उत्सवांची परंपरा तसेच जवळपास प्रत्येक महिन्यात येणाऱ्या विविध धर्म, पंथाचे आणि प्रांताचे धार्मिक सण, उत्सव येत असल्याने देशातील बाजारपेठेत उत्साह दिसून येतो. या उत्साहाला दिवाळसणात भरती येत असून, यावर्षी दिवाळसणात ई-गॅझेटचा बोलबाला दिसून येत आहे.दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सध्या बाजारात इलेक्टॉनिक वस्तूंना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यात स्मार्ट फोन, टॅबलेट, नोटफोन, लॅपटॉप आदि टचपॅड असलेल्या ई-गॅझेटवर सोप्या हप्त्यांमध्ये कर्ज व विमा मिळतो. त्यामुुळे सर्वसामान्य ग्राहकांनाही अशाप्रकारे ई-गॅझेट खरेदी करणे सोपे झाले आहे.- जितेंद्र बेलगावकर, संचालक, जितेंद्र वर्ल्ड.