शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

यंदापासून सर्वच प्रश्नपत्रिकांची ई-डिलिव्हरी

By admin | Updated: July 12, 2016 20:15 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांपासून सर्वच परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांची परीक्षा केंद्रांवर थेट ई-डिलिव्हरी करण्यात येणार आहे.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 12 - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांपासून सर्वच परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांची परीक्षा केंद्रांवर थेट ई-डिलिव्हरी करण्यात येणार आहे. उन्हाळी परीक्षांत अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिकांची या पद्धतीने डिलिव्हरी करण्यात आली होती. यात यश मिळाल्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यापीठावर येणारा ताण तसेच आर्थिक खर्च वाचणार आहे.राज्यातील विद्यापीठांमधील शिक्षणाचा दर्जा वाढावा व जास्तीत जास्त प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर व्हावा याकरीता राज्य शासनाने राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखालील समितीची स्थापना केली होती. या समितीने केलेल्या शिफारसींनुसार आयटी रिफॉर्म्ससाठी विद्यापीठाकडून प्रयत्न सुरू झाले. परीक्षा प्रणालीला ह्यआॅनलाईनह्ण स्वरुप आले असून परीक्षा अर्ज भरणे, निकाल लावणे, मूल्यांकन इत्यादी गोष्टी आॅनस्क्रीन व आॅनलाईन करण्यात येत आहे. त्याहून समोर जात प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांवर आॅनलाईन पद्धतीने पोहोचविण्याचा निर्णय घेण्यात आला.सुरुवातीला केवळ अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी हा प्रयोग राबविण्यात आला. यात कुठलाही अडथळा आला नाही व सुरळीतपणे परीक्षा पार पडली. या प्रक्रियेचे फायदे लक्षात घेता विद्यापीठाने हिवाळी परीक्षांपासून सर्वच अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिकांचे थेट ई-डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी दिली.पेपरच्या दिवशी सकाळी मिळणार पासवर्डज्या दिवशी पेपर असेल तेव्हा सकाळी ७.३० वाजता लॉगिन आयडी व पासवर्ड देण्यात येतील. हा पासवर्ड प्रत्येक वेळी वेगवेगळा असेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे संबंधित अधिकाऱ्याच्या चेहऱ्याचे स्कॅनिंग होऊनच अकाऊंट उघडू शकेल. सकाळी ८.३० वाजता महाविद्यालयाला प्रश्नपत्रिका मिळेल. संबंधित प्रणाली ही अतिशय सुरक्षित असून पेपर फुटण्याची कुठेही शक्यता नाही. समजा परीक्षा केंद्रावरील संबंधित अधिकारी काही आकस्मित कारणांमुळे पेपरच्या दिवशी पोहोचू शकला नाही तर काय करायचे याबाबत विद्यापीठाकडून आपत्कालीन आराखडा तयार करण्यात आला आहे.