शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
4
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
5
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
6
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
7
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
8
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
9
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
10
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
11
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
12
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
13
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
14
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
15
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
16
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
17
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
18
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
19
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
20
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘ई-बाईक टॅक्सीचालकांना मंडळात सामावून घेणार’, मंत्री प्रताप सरनाईक नोंदणी शुल्क रद्द न करण्यावर ठाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 14:26 IST

‘E-bike Taxi Drivers:

मुंबई -  महामुंबईसह राज्यातील ऑटो आणि टॅक्सी चालकांसाठी स्थापन करण्यात आलेल्या धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी चालक कल्याण मंडळामध्ये आता ई बाईक टॅक्सी चालकांनादेखील सामावून घेणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. तसेच सभासद नोंदणी शुल्क रद्द करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील असंघटित क्षेत्रातील ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी चालकांना सरकारी योजनांचा लाभ मिळावा, या उद्देशाने शासनाने ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा, मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळा’ची स्थापना केली आहे. दरम्यान, या मंडळामध्ये नोंदणी शुल्क आणि वार्षिक शुल्कावरून वाद निर्माण झाला होता. याला विरोध करत ऑटो रिक्षा मेन्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी काही दिवसांपूर्वी आंदोलन केले होते, तर नोंदणी शुल्क रद्द न केल्यास ते आणखी तीव्र करण्याचे संकेत त्यांनी दिले होते.सरनाईक यांच्या मते मुंबईमध्ये धावणाऱ्या अनधिकृत बाईक टॅक्सीवर कारवाईही सुरू आहे. तसेच तात्पुरत्या स्वरूपात ज्यांचे परवाने रद्द केलेले आहेत, त्यांना कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर पुन्हा परवाने देण्यात येतील. 

...तर आरटीओ अधिकाऱ्यांवर कारवाई राज्यात रिक्षा चालवायची असल्यास रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी येणे बंधनकारक असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले. त्यांच्या मते जर प्रवासी मराठीत बोलत असेल तर चालकाला मराठी येणे अनिवार्य आहे. तसेच मराठी न येणाऱ्या चालकांना परवाना दिल्याचे निदर्शनास आल्यावर आरटीओ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. 

सध्या दहा हजारपेक्षा जास्त सदस्य नोंदणी  झाली आहे. शुल्काबद्दल शशांक राव यांच्यासोबत स्वतः बोलू. कारण याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा चालकांना मिळेल. यात ई बाईक टॅक्सी चालकांनाही सामावून घेण्यात येणार आहे.  - प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री 

राज्यात सुमारे १५ लाखांपेक्षा जास्त ऑटो रिक्षा, मीटर टॅक्सी आहेत. वर्षाला परवान्यासाठी १५०० रुपये भरले जातात. पुन्हा नोंदणी शुल्काद्वारे १२० कोटी जमा केले जाणार आणि जर ते ६५ वर्षांनंतर हयातीत असतील तर त्यांना महिन्याला १० हजार रुपये मिळणार. या योजनेचा लाभ चालकांना नसून, परिवहन खात्याला आणि शासनालाच जास्त होणार आहे. शशांक राव, अध्यक्ष, मुंबई ऑटो रिक्षा आणि टॅक्सीमेन्स युनियन

English
हिंदी सारांश
Web Title : E-bike taxi drivers included, registration fee stands: Pratap Sarnaik

Web Summary : E-bike taxi drivers will be included in the auto-taxi drivers' welfare board. Transport Minister Pratap Sarnaik insists on keeping the registration fee. Unions are protesting this fee, claiming it benefits the government more than drivers.
टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईक