शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या ‘भंगार’ वाहनांचा ई लिलाव

By admin | Updated: July 14, 2015 03:20 IST

माहूल गावात पाच एकराच्या पोलीस मैदानावर पडून असलेल्या पोलिसांच्या ८०० पेक्षा जास्त वाहनांचा भंगार म्हणून ई लिलाव केला जाणार आहे. पोलीस दलाकडे वाहनांची टंचाई

- डिप्पी वांकाणी, मुंबई : माहूल गावात पाच एकराच्या पोलीस मैदानावर पडून असलेल्या पोलिसांच्या ८०० पेक्षा जास्त वाहनांचा भंगार म्हणून ई लिलाव केला जाणार आहे. पोलीस दलाकडे वाहनांची टंचाई असल्यामुळे ही वाहने अक्षरश: भंगार होईपर्यंत वापरली गेली, असे शल्य एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’कडे व्यक्त केले. चोरी-अपघात अशा खटल्यांतील बेवारस अवस्थेत सापडलेली अनेक वाहने पोलीस ठाण्यांच्या शिवारात पडून असतात व त्यांच्यावर कित्येक वर्षे कोणीही मालकी सांगत नाही. अशा वाहनांचाही लिलाव होणार आहे. या वाहनांची निश्चित किंमत तज्ज्ञांनी ठरविल्यानंतर नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरच्या मदतीने हा लिलाव होईल.‘ही सगळी वाहने एकतर १० वर्षे जुनी किंवा २ लाख ४० हजार किलोमीटर चालविलेली आहेत. आमच्याकडे वाहनांचा तुटवडा असल्यामुळे ही वाहने कुचकामी होईपर्यंत आमचे लोक ती वापरतात. शिवाय नवे वाहन प्रत्यक्ष उपलब्ध होईपर्यंत ही वाहने पुन्हा पुन्हा दुरुस्त करून वापरली जातात, असे एका आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले. हा अधिकारी म्हणाला, ‘ही वाहने निदान पाच वर्षांपासून भंगार म्हणून पडून आहेत. खरेतर फार पूर्वीच त्यांचा लिलाव व्हायला हवा होता. या वाहनांची विल्हेवाट लावायचे काम कोणीही केले नाही. गेल्या पाच वर्षांत तरी त्यांचा लिलाव झालेला नाही. या वाहनांत पोलिसांच्या जीप्स, कार्स, दुचाकी, व्हॅन्स इत्यादींचा समावेश आहे. पोलिसांच्या मोटार वाहतूक विभागासाठी राखीव असलेल्या मैदानावर या वाहनांचे ढीगच्या ढीग साचले आहेत. या भंगाराचा लिलाव झाल्यानंतर फार मोठी जागा उपलब्ध होऊन तिचा वापर इतर कारणांसाठी करता येईल. अतिरिक्त पोलीस आयुक्त (लोकल आर्म्स) कैसर खालीद म्हणाले, की लिलावात भाग घेणाऱ्यांना प्रारंभी त्यांच्या नावाची आॅनलाइन नोंदणी करून इसारा रक्कम भरावी लागेल. ते झाल्यानंतर लिलावाची तारीख जाहीर केली जाईल. लिलावातून मिळणारा पैसा सरकारकडे जमा होईल. या भंगाराची किमत निश्चित करण्याचे (म्हणजे त्यातून राखीव किमत स्पष्ट होईल) काम सध्या मोटार वाहतूक विभाग करीत आहे, असे खालीद म्हणाले. यापूर्वी सरकारच्या वाहतूक सेवेने पॉवर अँड वर्क्स डिपार्टमेंटसह अशाच प्रकारचा लिलाव केला होता. आम्हीही याच प्रकारे या महिनाअखेर लिलाव करणार आहोत, असे खालीद म्हणाले.