शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू

By admin | Updated: May 9, 2017 02:33 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या मंत्रिमंडळातील काही अकार्यक्षम मंत्र्यांची गच्छंती करून काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या मंत्रिमंडळातील काही अकार्यक्षम मंत्र्यांची गच्छंती करून काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता आहे. गुणवत्ता आणि कार्यक्षमता या निकषावरच हा फेरबदल असेल. मुख्यमंत्री फडणवीस हे गतिमान आणि पारदर्शक निर्णयांचा आग्रह धरत आले आहेत. प्रचंड कार्यक्षमतेने झोकून देऊन काम करण्याची त्यांची शैली आहे. आपल्या सहकारी मंत्र्यांनी याच पद्धतीने काम करावे ही त्यांची साहजिकच अपेक्षा आहे. एकटे मुख्यमंत्री अन् बोटावर मोजण्याइतके काही मंत्री वगळले तर अन्य बहुतेक मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड चांगले नाही. या मंत्र्यांच्या सुमार कामगिरीचा परिणाम सरकारच्या प्रतिमेवरही झाला आहे. ही प्रतिमा बदलण्यासाठी मंत्र्यांना बदलावे लागेल, अशी चर्चा आहे. सूत्रांनी सांगितले की, कार्यक्षमतेच्या मुद्द्यावर काहींना वगळून नव्या चेहऱ्यांना मंत्री करण्याच्या मुद्द्यावरच पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्री फडणवीस यांना मंत्रिमंडळ फेरबदलाची परवानगी दिली आहे. त्यामुळे जात, प्रादेशिक संतुलन या नेहमीच्या फुटपट्ट्यांपेक्षा कार्यक्षमता, आवाका या निकषांवर नजीकच्या काळात मंत्रिमंडळात फेरबदल होऊ शकतो. राज्याच्या विविध क्षेत्रांतील विकासाचे आपले व्हिजन सक्षमपणे राबविण्यासाठी तेवढ्याच सक्षम मंत्र्यांचा समावेश असलेल्या ‘टीम देवेंद्र’ची आवश्यकता स्वत: मुख्यमंत्र्यांना भासत आहे. अडीच वर्षांनंतरही सरकारचा म्हणावा तसा प्रभाव पडत नसेल तर काही बदल करणे गरजेचे आहे, या निष्कर्षाप्रत ते आले असल्याचे त्यांच्या निकटस्थांनी सांगितले. भाजपासोबतच शिवसेनेच्याही काही अकार्यक्षम मंत्र्यांना बदलले जाऊ शकते. पक्षाच्या चार कॅबिनेट मंत्र्यांबाबत शिवसेना आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. ‘मी योग्य वेळी योग्य निर्णय घेईन’ असे ठाकरे यांनी त्या वेळी सांगून आमदारांना शांत केले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेच्याही काही मंत्र्यांना वगळण्याचा निर्णय ठाकरे यांनी लवकरच घेतला तर भाजपासोबतच शिवसेनेच्याही काही मंत्र्यांना घरचा रस्ता दाखविला जाऊ शकतो. त्याबाबतचे सर्वाधिकार हे ठाकरे यांचे असतील. सरकारची प्रतिमा उंचावण्याचा उद्देश-हा फेरबदल नक्की कधी होईल, हे सांगता येणार नाही. मात्र, फेरबदल झालाच तर तो मोठा असेल. उर्वरित अडीच वर्षांत सरकारची प्रतिमा उंचावण्याचा उद्देश समोर ठेवूनच हा फेरबदल असेल. सक्षम मंत्र्यांचा समावेश असलेल्या ‘टीम देवेंद्र’ची आवश्यकता स्वत: मुख्यमंत्र्यांना भासत आहे. अडीच वर्षांनंतरही सरकारचा म्हणावा तसा प्रभाव पडत नसेल तर काही बदल करणे गरजेचे आहे, या निष्कर्षाप्रत ते आले असल्याचे त्यांच्या निकटस्थांनी सांगितले.