ऑनलाइन लोकमत
भुसावळ, दि. ३० - यावलकडून भुसावळकडे निघालेल्या मिनी बसचे स्टेअरींग फ्री झाल्याने ती यावल टोल नाक्यावरील डिव्हायडरवर आदळून झालेल्या अपघातात बसमधील सहा प्रवासी किरकोळ जखमी झाले़ हा अपघात गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडला़यावल-भुसावळ मिनी बस (एम़एच़०६ एस़७९६१) भुसावळकडे येत असताना तिचे स्टेअरींग फ्री झाल्याने ती बंद असलेल्या यावल टोल नाक्याच्या डिव्हायडरवर आदळली़ या अपघातात वाहक निवृत्ती पाटील, प्रवासी बैजलखान इसाखान (साकळी), मीराबाई सुपडू कोळी (राजुरा), उषाबाई प्रदीप कोळी व कुसुमबाई शामराव कोळी (सांगवी खुर्द), कलाबाई पांडुरंग पाटील (चितोडा) हे किरकोळ जखमी झाले़ प्रवाशांच्या हाता-पायाला किरकोळ ईजा झाली़ बसचे चालक एस़एल़भगत असल्याचे सांगण्यात आले तर त्यांना मात्र ईजा झाली नसल्याचे सांगण्यात आले़ अपघातनंतर यावल आगार प्रशासनाने धाव घेत जखमींना पाचशे तसेच एक हजार रुपयांची मदत करीत खाजगी रुग्णालयात दाखल केले़ रात्री उशिरापर्यंत या संदर्भात गुन्हा दाखल झालेला नव्हता़