शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
13
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
14
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
16
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
17
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
18
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
19
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
20
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

एक लाखाचा मागितला हुंडा, विवाहितेने केली आत्महत्या

By admin | Updated: April 28, 2017 17:24 IST

हुंडा हा विषय रूढार्थाने चावून चोथा झालेला विषय असला तरी आज 21व्या शतकातही भारतीय समाजाला पोखरणारी सर्वात ज्वलंत समस्या ठरला आहे

ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. 28 - हुंडा हा विषय रूढार्थाने चावून चोथा झालेला विषय असला तरी आज 21व्या शतकातही भारतीय समाजाला पोखरणारी सर्वात ज्वलंत समस्या ठरला आहे. सोलापूरमध्ये हुंडाबळीचे प्रकरण समोर आले आहे. कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे आण म्हणून सासरचे सतत तगादा लावत होते म्हणून एका विवाहितेने आत्महत्या केली आहे. गृहकर्जाचा हप्ता फेडण्यासाठी माहेरुन एक लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेवर सासरच्यांनी दबाव आणल्याचा आरोप आहे.एबीपी न्युजच्या वृत्तानुसार, सोलापुर येथील मोहोळमध्ये हुंड्याच्या जाचाला कंटाळून शहनाज मुलाणी या विवाहितेने आत्महत्या केली आहे. शहनाज मूळची उस्मानाबाद जिल्ह्यातल्या भूम गावची रहिवासी होती. 5 मे 2015 रोजी सोलापूरमधील बार्शीतल्या शकील मुलाणीसोबत तिचा विवाह झाला होता. कळसेनगरात नांदायला आलेल्या शहनाजचा पैशांसाठी छळ होत असल्याचा आरोप माहेरच्यांनी केला आहे.विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी मोहोळ पोलिसात 8 दिवसांनी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गृहकर्जाचा हप्ता भरण्यासाठी शहनाजकडे एक लाख रुपयांची मागणी केली होती. या जाचाला कंटाळून 19 एप्रिलला शहनाजने स्वतःला पेटवून घेतलं. 20 तारखेला तिचा मृत्यू झाला. चौकशीनंतर मोहोळ पोलिसांनी पती शकील मुलाणीसह सासू, सासरे आणि दीरावर गुन्हा दाखल केला आहे