नवी मुंबई : नवी मुंबईसह, पनवेल परिसरात आज दुपारपर्यंत तिव्र उखाड्यामुळे नागरिक हैराण झाले. सायंकाळीमात्र सुसाट्याचा वारा सुटल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. वार्यामुळे सायंकाळी सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण झाले होते. शहरात आज उन्हाचा पारा चढल्यामुळे कामावर गेलेल्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. ११ वाजताच तापमान ३६ अंशावर पोहचले होते. हमालीचे काम करणारे व फेरीवाल्यांना काम करणे अशक्य होवू लागले होते. उन्हापासून दिलासा मिळावा यासाठी नागरिकांनी रसवंतीगृह व हॉटेलमध्ये गर्दी करण्यास सुरवात केली होती. दुपारी रोडवर वाहनांची संख्याही कमी झाली होती. दुपारपर्यंत उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना सायंकाळी मात्र अल्पसा दिलासा मिळाला. पनवेलच्या काही भागात वादळ सुरू झाले होते. नवी मुंबईमध्येही सुसाट्याचा वारा सुरू झाला होता. कोणत्याही क्षण पाऊस पडेल अशी शक्यता निर्माण झाली होती. वातावरणात सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण झाले होते.
नवी मुंबईसह पनवेलमध्ये धुळीचे साम्राज्य
By admin | Updated: May 8, 2014 02:39 IST