शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

निधीअभावी तिरंदाज विशालचे स्वप्न धुळीस!

By admin | Updated: August 3, 2016 02:50 IST

आॅलिम्पिकच्या तयारीसाठी लाखो रुपये खेळाडूंवर खर्च होत आहेत.

रोहा : आॅलिम्पिकच्या तयारीसाठी लाखो रुपये खेळाडूंवर खर्च होत आहेत. क्रिकेटसारख्या खेळात कोट्यवधी खर्च केले जात आहेत. प्रो कबड्डीमुळे पटूंनादेखील चांगले दिवस येत आहेत. परंतु अनादी काळापासून धनुर्विद्या आपल्या देशात शिकवली जात आहे. अनेक तरुणांनी यात कौशल्य देखील प्राप्त केले आहे. मात्र निधीअभावी त्यांच्या वाटेला निराशाच येत आहे.रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यातील धाटाव गावातील तिरंदाजपटू धनुर्धर विशाल श्रीराम कदम याची २४ ते ३० सप्टेंबर २०१६ या कालावधीत आॅस्ट्रेलिया येथील स्पर्धेस जाण्यासाठी आवश्यक निधी जमा करता आला नाही तर यामुळे जागतिक पातळीवर तिरंदाजी या प्रकारात देशाचे नाव, रायगडचे नाव उंचविण्याचे विशाल कदम याचे स्वप्न धुळीस मिळणार अशी चिन्हे दिसून येत आहेत. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असताना देखील तालुका, राज्य व राष्ट्रीय पातळीवर विशालने सर्वोत्तम कामगिरी करत राष्ट्रीय पातळीवर २ सिल्व्हर व १ ब्रॉन्झ, राज्य पातळीवर १ गोल्ड व ब्राँझ पदकाची कमाई केली आहे. जागतिक मैदानी तिरंदाजी स्पर्धेसाठी पात्र ठरणारा विशाल कदम हा रायगड जिल्ह्यातील पहिलाच खेळाडू आहे. या स्पर्धेची प्रवेश फी, व्हिसा व विमान प्रवासाचे तिकीट, राहण्याच्या व्यवस्थेसह इतर खर्च धरुन विशाल कदम याला ३ लाख ७० हजार रुपयांची आवश्यकता आहे. धनुर्विद्येसारख्या प्राचीन खेळात नैपुण्य प्राप्त केलेल्या या खेळाडूसाठी दाता मिळत नसल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर) स्पर्धेसाठी पात्र घरची आर्थिक परिस्थिती बेताची असताना देखील तालुका, राज्य व राष्ट्रीय पातळीवर विशालने सर्वोत्तम कामगिरी करत राष्ट्रीय पातळीवर २ सिल्व्हर व १ ब्रॉन्झ, राज्य पातळीवर १ गोल्ड व ब्रॉन्झ पदकाची कमाई केली आहे. जागतिक मैदानी तिरंदाजी स्पर्धेसाठी पात्र ठरणारा विशाल जिल्ह्यातील पहिलाच खेळाडू आहे. त्याला या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ३ लाख ७० हजारांची आवश्यकता आहे.