शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘शिफ्टिंग’दरम्यान सामान पळविणारे अमरावती पोलिसांच्या जाळ्यात

By admin | Updated: August 12, 2014 01:04 IST

नागपूर केंद्रीय पोलीस दलातील (सीआरपीएफ) उपनिरीक्षकाचा विश्वासघात करुन त्यांचे लाखो रुपयांचे घरगुती सामान पळवून नेणाऱ्या दोन आरोपींना रविवारी पोलिसांनी अटक केली. अमरावतीच्या

नागपूर येथील घटना : केंद्रीय पोलीस दलातील उपनिरीक्षकाची फसवणूकअमरावती : नागपूर केंद्रीय पोलीस दलातील (सीआरपीएफ) उपनिरीक्षकाचा विश्वासघात करुन त्यांचे लाखो रुपयांचे घरगुती सामान पळवून नेणाऱ्या दोन आरोपींना रविवारी पोलिसांनी अटक केली. अमरावतीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कामगिरी केली. फिरोज खान नूर खान (२७, जाहीदनगर, अमरावती) व मो. नाझीम मो. इलियास (५२, रा. बिसमिल्लानगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.दिनदयाल यादव हे नागपूर येथील केंद्रीय पोलीस दलात कार्यरत होते. त्यांचा मुक्काम पोलीस वसाहतीत होता. बंगळूर येथे बदली झाल्यामुळे त्यांना त्यांचे घरातील सामान बंगळूरला न्यायचे होते. त्यासाठी त्यांनी ट्रान्सपोर्ट व्यवसायी फिरोज खान याच्याशी संपर्क साधला. ठरल्याप्रमाणे फिरोजने टाटा एस क्रमांक एम.एच.२७ एक्स ४७२४ चा चालक मो.नाझीम याला नागपूर येथे सामान आणण्यासाठी पाठविले. १६ जुलै रोजी यादव यांच्या घरुन दुचाकी, फ्रीज, दिवाण, २ सीआरपीएफ कंपनीच्या बॉक्स कीट, खुर्ची, टेबल, टी.व्ही. कुलर इत्यादी अंदाजे अडीच लाख रुपये किंमतीचे सामान टाटा एस. गाडीत भरून अमरावतीकडे रवाना झाले. अमरावतीहून हे सामान ट्रकने बंगळूर येथे पाठविण्याचे ठरले होते. परंतु हे सामान बंगळूर येथे पोहचलेच नाही. यादव यांनी फिरोज खान सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा भ्रमणध्वनी बंद होता. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच यादव यांनी ४ आॅगस्ट रोजी नागपूर येथील सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी फिरोज खान व मो.नाझीम यांच्याविरुद्ध विश्वासघात केल्याप्रकरणी कलम ४०८ नुसार गुन्हा नोंदविला आहे. आरोपी अमरावतीत असल्याची माहिती सोनेगाव पोलिसांना मिळताच त्यांनी रविवारी अमरावती पोलिसांना सूचना दिली. अमरावती पोलिसांनी याप्रकरणाचा शिताफीने तपास करुन आरोपी मो. नाझीन व मुख्य सूत्रधार फिरोज खान याला रविवारी रात्री उशिरा अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी टाटा एस. वाहन जप्त केले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांच्या मार्गदर्शनात गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम, सहायक पोलीस निरीक्षक गोपाल उपाध्ये, गणेश काळे, सुभाष पटील, पंकज यादव, संतोष शिखरे, दीपक दुबे, संजय धंदर यांनी केली.