शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-मुुंबई प्रवासादरम्यान चार लाखांचे दागिने लंपास

By admin | Updated: February 15, 2016 03:51 IST

राज्य परिवहन (एसटी) सेवेच्या हिरकणी बसमधून पुणे ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सुटकेसमधून चार लाख ३६ हजार ५०० रुपयांचे दागिने चोरीला जाण्याचा प्रकार अलीकडेच घडला.

ठाणे : राज्य परिवहन (एसटी) सेवेच्या हिरकणी बसमधून पुणे ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सुटकेसमधून चार लाख ३६ हजार ५०० रुपयांचे दागिने चोरीला जाण्याचा प्रकार अलीकडेच घडला. याप्रकरणी या दाम्पत्याने पुणे शहर आयुक्तालयातील स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर ती आता नौपाडा पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे.नौपाड्याच्या हरिनिवास सर्कलजवळील ठाणावाला चाळीत राहणारे ६९ वर्षीय ज्येष्ठ नागरिक सपत्नीक ठाण्याकडे येण्यासाठी स्वारगेट बसस्थानकातून २५ जानेवारी २०१६ रोजी एसटीमध्ये बसले. त्यांनी नंबर लॉक असलेल्या बॅगेत दागिन्यांसह त्यांचे इतर सामान ठेवले होते. दुपारी २.४५ ते सायंकाळी ७.३० वा.दरम्यान एका भामट्याने त्यांच्या बॅगेच्या लॉकचा क्रमांक जुळवून बॅगेतील ६२ हजार ५०० रुपयांची सोनसाखळी, एक लाख १२ हजारांचे नेकलेस आणि कानातील टॉप्स (वजन साडेचार तोळे), सहा तोळ्यांच्या एक लाख ६२ हजारांच्या दोन पाटल्या आणि एक लाखाचे सोन्याचे मंगळसूत्र असा ऐवज लंपास केला. सर्वत्र शोधाशोध करूनही आपल्या सुटकेसमधील दागिने न सापडल्यामुळे त्यांनी अखेर स्वारगेट पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार नोंदविली. हा गुन्हा आता स्वारगेट पोलिसांनी नौपाडा पोलिसांकडे वर्ग केला असून सहायक पोलीस निरीक्षक निर्मला पाटील या अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)