शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

संमेलनकाळात जमला साडेसात टन कचरा

By admin | Updated: February 9, 2017 04:06 IST

शहरातील क्रीडासंकुलात ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान झालेल्या नव्वदाव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या कालावधीत ७.५ टन कचऱ्याची विल्हेवाट

अनिकेत घमंडी, डोंबिवलीशहरातील क्रीडासंकुलात ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान झालेल्या नव्वदाव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या कालावधीत ७.५ टन कचऱ्याची विल्हेवाट कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्वच्छता विभागाने लावली. त्यात ५.५ टन कचरा, तर २ टन सुका कचरा होता. सध्या मंडप उतरवण्याचे काम सुरू असून आणखी एक टन कचरा निघेल. त्याचीही तातडीने विल्हेवाट लावण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.महापालिकेच्या ‘ई’ प्रभाग स्वच्छता विभागाचे अधिकारी नरेंद्र धोत्रे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, ओला व सुका कचरा टाकण्यासाठी चार ठिकाणी नियोजन केले होते. सुक्या कचऱ्यामध्ये प्लास्टिक, पाण्याच्या बाटल्या, कागद, पुठ्ठे, पाण्याचे ग्लास आदी गोळा करण्यात आले. तर, ओल्या कचऱ्यात भोजन, न्याहारी, चहापान आदी ठिकाणी उरलेले अन्न, भाज्यांची टरफले तसेच भोजनमंडप आदी ठिकाणचा कचरा होता. ठिकठिकाणी कचऱ्याच्या पेट्या ठेवल्या होत्या. स्वच्छतेसाठी दोन शिफ्टमध्ये २४ कामगार नेमले होते. तसेच १२ जानेवारीपासून मैदानाच्या सफाईसाठी १५ कामगार कार्यरत होते. कचरा उचलणे तसेच तो डम्पिंगपर्यंत वाहून नेण्यासाठी एक बुलडोझर, ट्रक, आरसीसी गाड्या तैनात होत्या. प्लास्टिक कचरा तातडीने वेगळा करण्यात आला. त्यामुळे त्याची तातडीने विल्हेवाट लावता आली.त्याचबरोबर संमेलनस्थळी प्रत्येक सभामंडपात धूरफवारणी, जंतुनाशक पावडरफवारणी तसेच तीन फिरती शौचालये सज्ज ठेवण्यात आली होती. त्यामुळे येथे साहित्यप्रेमींची कुठलीही गैरसोय झाली नाही, असे ते म्हणाले. साहित्यप्रेमींचेही सहकार्यसाहित्यप्रेमी, नागरिक यांनीही स्वच्छता राखण्यासाठी साहाय्य केले. कुठेही अनावश्यक कचरा टाकला नाही. स्वच्छ भारत अभियान जागृतीचे बॅनर लावल्याने काहीसा फरक पडला.कचरापेट्यांमध्येच उपस्थितांनी कचरा टाकल्याने सफाई कामगारांनाही त्रास झाला नाही. स्वच्छता ठेवणे सोपे झाल्याचे धोत्रे म्हणाले.